संगणक परिचालक यांच्या समस्या पालक मंत्री साहेब तुम्ही सोडविणार का – सुनील ठोसर पाटील

    37

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    बीड(दि.16सप्टेंबर):- जिल्ह्यातील संगणक परिचालक यांच्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत विभागीय कार्यालय येथे तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर असे विविध प्रकारचे आंदोलने महाराष्ट्रातील आमच्या संगणक परिचालक बांधवांनी केले मात्र आपण विरोधी पक्ष नेते असताना आपण दिलेले वचन केवळ घोषणेचा पाऊस असे होताना दिसत आहे संगणक परिचालक यांच्या विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, संघटनेची ताकद पाहून आपण सर्व विभागातील संगणक परिचालक यांच्या विविध विभागांचा आढावा घेऊन लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी जो विश्वास दिला होता आता आपण सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्हा पालक मंत्री असल्यामुळे बीड जिल्ह्यातील संगणक परिचालक यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

    आपण विरोधी पक्ष नेते असताना केवळ आश्वासन दिली आता आपण सामाजिक न्याय मंत्री आहात आमच्या मागण्या पूर्ण करा..! अनेक संगणक परिचालक यांचे योगदान हे आपल्या सरकार सोबत एक भाग आहे यांचे योगदान महत्त्वाचे असून संगणक परिचालक यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी आपण पाऊले उचलली नाहीत तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री साहेब संगणक परिचालक यांच्या सह विविध संघटना सोबत घेऊन घेराव आंदोलन करणार असल्याचे रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले.