पूरग्रस्तांनावर अन्याय झाल्यास आंदोलन करू – पारोमिता गोस्वामी

14

🔺पात्र पूरग्रस्तांना सर्वे तुन डावलले : खरकाडा येथील प्रकार

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.16सप्टेंबर):- तालुक्यातील गेल्या पंधरा दिवसापूर्वी आलेल्या वैनगंगा नदीला पूर आलेला होता या पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्यात जवळपास 25 गावांना जास्तच बसला असून , खरकाडा येथेही पुराचे पाणी गावात घरात शिरले होते यात अनेकांची घरे पडली शासनाकडून सर्वे झाला मात्र जूनिवस्ती मधील घरे पडलेल्यांची नावे सर्वेक्षणामध्ये समाविष्ट न करण्यात आल्याचा प्रकार खरकाडा येथे घडला या प्रकाराची दखल आम आदमी पार्टी’च्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी घेतली व खरकाडा येथे नव्याने सर्वेक्षण करून पुरात घरे पडलेल्या बाधितांना समाविष्ट करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली.

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदी किनारी असलेल्या गावात पुराचे पाणी गेल्याने प्रचंड प्रमाणात हानी झाली जीवनावश्यक साहित्य वाहून गेले यात शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे अनेक घरे जमीनदोस्त झाली असल्याने कुटुंब रस्त्यावर आली असल्याने संसार सावरण्यासाठी नागरिकांना प्रचंड संकटाचा सामना करावा लागत आहे

ब्रह्मपुरी तालुक्यात सरासरी 25 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते यात अनेक घरे पडली व भिंतींना तडे गेले आहेत खारका डायेथेही पुराचे पाणी शिरले होते यात अनेक घरे पडली शासनाकडून घराची झालेली नुकसान अंशता व पूर्णता या निकषानुसार मदतीचे धोरण जाहीर केले तसेच शासनाकडून पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले खरकाडा येथे जुन्या वस्तीमध्ये पुराचे पाणी गेले असता अनेक घरे पडली मात्र झालेल्या सर्वेक्षणामध्ये ज्या व्यक्तींची घरे पडली अशा व्यक्तींना सर्वे मधून डावलण्यात आले व ज्या व्यक्तींच्या घरी पुराचे पाणी गेलेही नाही अश्या व्यक्तींना ही अंशता व पूर्णता स्वरूपात सर्वे मध्ये नावे समाविष्ट करण्यात आली ही बाब खरकाडा येथील पूरग्रस्तांनी आम आदमी पार्टीच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांच्या निदर्शनात आणून देत होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी केली याची तात्काळ दखल घेत पारोमिता गोस्वामी यांनी गावकऱ्यांसह तहसील कार्यालयात धडक दिली व तहसीलदारविजय पवार यांची भेट घेऊन पुन्हा सर्वे करून डावलण्यात आलेल्या पूरग्रस्तांना समाविष्ट करण्यात यावे व कुठलाही पूरग्रस्त हा मदतीपासून वंचित राहू नये याची प्रशासनाने काटेकोरपणे दक्षता घ्यावी अशी मागणी केली पूरग्रस्तांना वर अन्याय झाल्यास आंदोलनाचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने दिला जाईल असा इशारा दिला या मागणीची तात्काळ तहसीलदार विजय पवार यांनी दखल घेत नव्याने पंचनामा करण्याकरिता टीम तयार करून त्यांना सर्वे करण्याचे आदेश दिले .

यावेळी किशोर प्रधान, शंकर ठाकरे माणिक मुळे, अशोक मेश्राम, चक्रधर कुथे, विवेक दाणे, हिरामण मुळे, किसन दहिकर, यशवंत ठाकरे, देवलाबाई लांजेवार, ललिताबाई दाणे, सचिन प्रधान, अविनाश बेदरे, गौतम टेम्भुरणे, विजय ढोरे, सुभाष बगमारे, देविदास मेश्राम, नलू शिउरकार, महेश दाणे, मनीष बेदरे, नरेश लांजेवार व खरकाडा येथील पूरग्रस्त उपस्थित होते.