बीडी उत्पादकाने संत महापुरुष यांचे फोटो टाकुन आपली स्वतःची पोळी भाजने बंद करा-हभप श्री. सुभाष महाराज बच्छाव

28

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.16सप्टेंबर):-संत जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या संताचे नांवाचा व फोटोचा वापर करुन आमली व मादक पदार्थ खपासाठी व स्वतःची पोळी भाजुन घेण्यासाठी मुर्खपणा ताबडतोब बंद करा असे नाशिक वारकरी महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री. सुभाष महाराज बच्छाव यांनी सांगीतले,ते देवळा तहसिल कार्यालयात निषेध नोंदविण्यासाठी बोलत होते. संत श्री.जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने उत्पादित बिडीवर बंदी आणावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ देवळा यांच्या तर्फे आज मा.त‌ह‌शिलदार साहेब देवळा निवेदन देण्यात आले.

वारकरी संप्रदायाची अस्मिता,महाराष्ट्र राज्याचे अराध्य स्थानअसणारे राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नांवाने निझामाबदच्या एका पटेल नामक उत्पादकाने तुकाराम बीडी नावाने उत्पादनास सुरुवात केली आहे, त्यामुळे अखंड भारतातील वारकरी सांप्रदाय नाराज झाला असुन सांप्रदायाने याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
श्री.संत तुकाराम महाराज यांनी समाजातील अपप्रवृतीला आळा बसावा यासाठी, व्यसनमुक्तीवर समाजप्रबोधन करुन हे आपल्या विविध अभंगातून परखड मत व्यक्त केले असतांना काही समाज विघातकांनी आपल्या व्यावसायिक कामासाठी संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा वापर केला आहे. याबाबत संबंधितांवर त्वरीत कारवाई होऊन उत्पादनावर बंदी घालण्यात यावी अन्यथा वारकरी महामंडळातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.आर के रांजने कार्याध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री , नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प. आण्णासाहेब महाराजआहेर हिसवळकर जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प सुभाष महाराज बच्छाव देवळा यांनी दिला आहे.

निवेदनावर महाराष्ट्र वारकरी महामंडळ नाशिकचे कोषाध्यक्ष हभप पुंडलिक महाराज पगार खडकतळे, देवळा तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष.ह.भ.प.अविनाश महाराज महाजन, उपाध्यक्ष ह.भ.प.तात्याभाऊ सावंत,हभप सचिव धर्मा सावंत,ह.भ.प.रामनाथ खैरणार,ह.भ.प.गोविंद महाराज पवार,ह.भ.प.विलास जोशी,ह.भ.प.दिनकर पगार,ह.भ.प.बाळासाहेब आहेर,हभप मधुकर अहिरे, हभपबापु शिंदे आदिंच्या सह्या आहेत.