राजुऱ्याचा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

स्वातंत्र्यापुर्वी काळापासून म्हणजे १८७४ पासून चांदा स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला गेला यज्ञ यावेळी मुल, ब्रहम्पुरी आणि वरोरा हे तीनच तालुके होते.त्याच वर्षी मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात आले आणि त्यातील चार तालुके चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९०७ साली नव्याने निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यास चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदाराचा काही भाग स्थलांतरित करण्यात आला.१९०७ मध्येच १५६० किमीचा भाग संलग्न करून मद्रास राज्याला जोडला गेला. १९११ते १९५५ या काळात जिल्ह्याच्या हद्दीमध्ये व त्यांच्या तालुक्यामध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही.पुर्विच्या मध्यप्रदेशात असलेला चंद्रपूर जिल्हा हा १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून मुंबई राज्याला जोडण्यात आला. आणि १९५६ मध्येच हैदराबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याच्या राजुरा तालुका हा नांदेड जिल्ह्याला जोडण्यात आला.त्या नंतर पुन्हा राजुरा तालुका १९५९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्यात आला.

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा स्वतंत्र दर्जा मिळाला. राज्य निर्मितीच्या वेळी चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यासह वरोरा,ब्रहम्पुरी,मुल, गोंडपिपरी, सिरोंचा आणि राजुरा हे तालुके अस्तित्वात होते.राजुरा तालुक्याच्या या भूमागाने आंध्रप्रदेश, मद्रास, हैदराबाद राजवटीबरोबर मध्यप्रदेश राज्याचाही प्रशासकीय अनुभव घेतला. आता १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा एक भाग म्हणून अस्तित्व असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्विच्या राजुरा तालुक्यातील जनतेने हैदराबादच्या निजामाचे अंत्यत वाईट अनुभव सहन केले आहेत. १५ आॅगस्ट १९४७ ला इंग्रजांच्या तावडीतून सुटका झाली भारत स्वतंत्र झाला. मात्र राजुरा तालुक्यात पारतंत्र्याचे साखळदंड आवळलेलेच होते.स्वातंत्र्याची सोनेरी किरणे पसरली असली तरी वर्धा नदीच्या काठाच्या पलीकडे पोहोचलेली नव्हती.कारण भारतात काही संस्थांनिकाचे राज्य होते. चंद्रपूर जिल्ह्यात दुसरीकडे स्वातंत्र्याचे जल्लोष साजरा होत असला तरी राजुरा तालुक्यातील जनतेवर हैदराबादच्या निजामशाहीचे अत्याचार होतच होते.भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन व्हायला तयार नव्हता.१६ सप्टेंबर १९४८ च्या दरम्यान निजाम सरकारचे समांतर सत्ताकेंद्र कासीम रजवी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले होते.हैद्राबाद संस्थानात राजुरा सोबत मराठवाड्याचा मोठा भाग निजामाच्या ताब्यात होता.निजामाची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वत्र विरोध, जाळपोळ, आंदोलने सारख्या घटना वाढल्या तरी सुद्धा निजाम आपले वर्चस्व सोडून स्वतंत्र भारतात सहभागी होण्यासाठी तयार नव्हते.शेवटी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी रेल्वे मार्गाने राजुऱ्यात भारतीय सेना पाठवून रझाकाराला पिटाळून लावले.गृहमंत्री यांच्या कार्यवाहीची माहिती समजताच रझाकारांनी वर्धा नदीवरील रेल्वे पुल उडविण्याचा कट रचला होता.मात्र हा कट भारतीय सैन्यानी हाणून पाडला.

या कार्यवाहीला पोलिस अॅक्शन असे म्हटले जात होते. या अॅक्शन मुळे रझाकारांना राजुरा येथुन पळ काढावा लागला.मराठवाडयातही निजामांना जर्जर करून सोडले.शेवटी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद निजामशाहीचा १७ संप्टेंबर १९४८ रोजी अस्त झाला.राजुरावासीयांच्या मदतीला भारतीय सैनिक धावली म्हणून राजुरावासी स्वतंत्र झाले. निजाम पडुन जाताच तहसील कार्यालयावर जनतेने तिरंगा ध्वज फडकावला. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यात १७ संप्टेंबरला स्वतंत्रदिना प्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यास केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

मराठवाड्यातून राजुरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात समावेश झाल्यामुळे मुक्ती दिन साजरा केला जात नव्हता.मात्र राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वामनराव चटप साहेब यांनी मराठवाड्याप्रमाणे राजुराऱ्यातही मुक्ती दिन साजरा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून घेतली.तेव्हापासून राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात १७ सप्टेंबरला दरवर्षी मुक्ती दिन म्हणून तिरंगा ध्वज फडकावून साजरा केला जातो.