नवे एसपी राजा रामास्वामी बीडमध्ये दाखल

    40

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    बीड(दि.20सप्टेंबर):-बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई गुप्तचर विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी हे बीडचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बीड शहरात दाखल झाले.आज दुपारी त्यांना बीड पोलिस दलाने सलामी देत स्वागत केले. बातमी लिहिपर्यंत बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्जहणून चार्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होती. आता राजा रामास्वामी यांच्या कामगिरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

    तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कामगिरी कौतुकास्पद मानली जात होती. परवा रात्री हर्ष पोद्दार यांची बदली होऊन बीडचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मुंबई गुप्तचर विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी यांचे नाव समोर आले. आज सकाळी राजा रामास्वामी बीड शहरात डेरेदाखल झाले. बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून ते आज चार्ज घेणार आहेत.

    आज दुपारी एकच्या नंतर बीड पोलिस दलाने नूतन एसपी राजा रामास्वामी यांना सलामी देत त्यांचे स्वागत केले. राजा रामास्वामी हे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था हाताळताना राजा रामास्वामी काय निर्णय घेतील याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा यासह अन्य अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ते काय उपाययोजना करतील याकडेही आता सर्वांचे लक्ष आहे.