अबब 7 महिन्यात वृत्तपत्रांच्या जाहिरातींवर काढले 17 लाखांचे बिल !

29

🔹आमदार फुंडकरांच्या नेतृत्वाखाली असलेल्या खामगांव कृ.उ.बा.समितीमध्ये सभापती टालेंचा प्रताप…..!!

🔸शासनमान्य यादीत नसलेला ‘‘साप्ताहिक समाजनिष्ठा’’ मालामाल

✒️खामगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगांव(दि.21सप्टेंबर):- विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या खामगांव कृ.उ.बा.स. समितीचे सभापती व सचिव यांच्या अनेक गैरप्रकार उजेडात येत असून सभापती संतोष टाले यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. सभापतींनी मागील सात महिन्याच्या काळात विविध वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातींवर तब्बल 17 लक्ष रुपये खर्च केले असून आपल्या मर्जितल्या काही वृत्तपत्रांना लाखो रुपयांच्या जाहिराती देउन बेकायदेशीर खर्च करण्यात आला आहे. या सात महिन्याच्या काळात ‘साप्ताहिक समाजनिष्ठा’ला बाजार समितीतर्फे विविध 20 जाहिरातींसाठी अंदाजे 1 लाख 86 हजार रुपयांचे देयके प्रदान करण्यात आली असून साप्ताहिक समाजनिष्ठा मालामाल झाले आहे.

साप्ताहिक समाजनिष्ठा नव्हे तर साप्ताहिक फुंडकर निष्ठा असल्याने या वृत्तपत्रावर भ्रष्टाचार व संगनमत करण्याच्या हेतुने सभापती संतोष टालेंची विशेष मेहरबानी झाली असल्याचे दिसून येते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव कृ.उ.बा.स.मध्ये सभापती संतोष टाले व सचीव यांनी केलेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत बाजार समितीचे तत्कालीन संचालक श्रीकृष्ण टिकार यांच्यासह पाच संचालकांनी मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत मा.जिल्हा उपनिबंधक यांनी कृ.उ.बा.स.मध्ये झालेल्या गैर प्रकाराबाबत कृषी उत्पन्न पणन अधिनियम (विकास व विनीमयन) 1963 चे कलम 40-ब नुसार चैकशी करण्याचे आदेश देउन श्री.कोल्हे,सहायक निबंधक,सहकारी संस्था,शेगांव यांची चैकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करुन प्रकरण 45 दिवसात चैकशी अहवाल सादर करण्याचे आदेश 20/07/2020 रोजी दिले होते.त्या अनुषंगाने मंगळवार दि.15 सप्टेंबर 2020 रोजी चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी तक्रारीची संबंधीत सर्वांना आपला लेखी जवाब सादर करण्याचे आदेश दिले होते. खामगांव कृ.उ.बा.स.च्या कार्यालयात चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी या प्रकरणी संबधीतांचे म्हणणे जाणुन घेतले. तक्रारदार बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृश्ण टिकार,माजी संचालक संजय झुनझुनवाला,माजी संचालक विवेक मोहता,माजी संचालक राजेष हेलोडे व तुशार चंदेल यांनी झालेल्या भ्रश्टाचाराबाबत आपला लेखी जवाब व त्या संबंधींचे पुराव्यासह सर्व कागदपत्रे चैकषी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली.

यावेळी तक्रारकर्ते माजी संचालक श्रीकृष्ण टिकार यांच्यासह इतर संचालकांनी विविध वृत्तपत्रांच्या जाहिरातींसाठी झालेल्या खर्चाबाबत चैकशी अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन देतांना सांगितले की, जिल्हा माहिती कार्यालय बुलडाणा यांच्याकडून बुलडाणा जिल्हयातील शासनमान्य ‘अ’वर्ग, ‘ब’ वर्ग व ‘क’ वर्ग वृत्तपत्रांची यादी मागीतली असता प्राप्त झालेल्या त्या शासनमान्य वृत्तपत्र व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या यादीमध्ये ‘‘साप्ताहिक समाजनिष्ठा’’ या वृत्तपत्राचे नाव नाही. बुलडाणा जिल्हयातील ‘क’ वर्ग दैनिक वृत्तपत्रांमध्ये खामगांव येथील सांज दैनिक प्रश्नकाल व सांज दैनिक खबरे श्यामतक यांचा समावेश असून प्रश्नकालचे जाहिरातीचे दर 6 रुपये चैरस सेंटीमिटर तर खबरे श्यामतक या सांज दैनिकाचे जाहिरातीचे दर 17 रुपये चैरस सेंटीमिटरचे आहे. वर्तमान पत्रात जाहिरात प्रकाशित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी स्वायत्त संस्थांनी शासकीय धोरणाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश परिपत्रकात नमुद असतांना सभापती संतोष टाले व सचिव मुकूटराव भिसे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवुन ‘अ’वर्गामध्ये समावेश असलेल्या वृत्तपत्राला जाहिरात न देता शासकीय दर सुचीमध्ये समावेश नसतांना व खप नसलेल्या व व्हाॅटअप ग्रुपवर चालणाÚया बळीराम वानखडे संपादक असलेल्या ‘साप्ताहिक समाजनिष्ठा’ या वृत्तपत्रामध्ये मागील सात महिन्याच्या काळात विविध 20 स्वरुपाच्या जाहिराती देउन त्याचे जवळपास अंदाज 1 लाख 86 हजार रुपयांचे बिले काढली आहे.

या जाहिरातींमध्ये 5 फेब्रुवारी 2020 रोजी आमदार आकाश फुंडकर वाढदिवस शुभेच्छा जाहिरात, 9 फेब्रुवारी 2020 रोजी बाबुरावसेठ लोखंडकार वाढदिवस जाहिरात, 15 फेब्रुवारी 2020 रोजी विठठ्ल लोखंडकार वाढदिवस शुभेच्छा जाहिरात प्रकाशित झाली असुन 18 मार्च 2020 रोजी देण्यात आलेल्या सत्कार समारंभ व माजी आमदार माणिकराव गावंडे यांच्या जीवन गौरव पुरस्कार सोहळा या एकाच जाहिरातीचे दोन बिले साप्ताहिक समाजनिष्ठाला देण्यात आले आहे. 4 एप्रिल 2020 रोजी संचालक दिलीप पाटील वाढदिवस जाहिरात, दि.16 मे 2020 रोजी सागर फुंडकर वाढदिवस जाहिरात, दि.14 जुलै 2020 रोजी साप्ताहिक समाजनिष्ठा वर्धापन दिवस शुभेच्छा जाहिरात तर दि. 2 आॅगस्ट 2020 रोजी स्व.भाऊसाहेब फुंडकर जयंती अश्या विविध जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहे.

तसेच दि.13 एप्रिल 2020 रोजीच्या साप्ताहिक समाजनिष्ठाच्या एकाच अंकात तीन वेगवेगळया जाहिराती प्रकाशित करुन त्याची बिले प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये 35 लक्ष रुपये खर्च झालेल्या धान्य किट वाटपासाठी दरपत्रके मागविणे, अंदाजे 9 लक्ष रुपये खर्च झालेल्या सॅनिटायझर फवारणीसाठी दरपत्रके मागविणे व बाजार समितीच्या मुख्य गेट जवळ टनेल बांधणीसाठी दरपत्रके मागविणे हया जाहिरातींचा समावेश आहे. तसेच कोरोना काळात शेतकरी बांधवांसाठी सीसीआय कापूस खरेदी, मका खरेदी केंद्राबाबत इतर सुचनांच्या जाहिराती साप्ताहिक समाजनिष्ठाला देण्यात आलेल्या आहे. बाजार समितीच्या वतीने दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या अंकात शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेल्या सुचना जाहिरातीचे 10 हजार 626 रुपयांचे बिल साप्ताहिक समाजनिष्ठाला देण्यात आले. परत त्याच जाहिराचे शुध्दीपत्रक काढून दि.18/04/2020 रोजीच्या अंकात जाहिरात प्रकाशित करुन त्या जाहिरातीचे सुध्दा 10 हजार 626 रुपयांचे बिल काढून शुध्दिपत्रकातही सभापती व सचिवांनी शुध्द फसवणुक करुन भ्रष्टचाराची परिसीमा गाठली आहे. तसेच दि.10 मे 2020 रोजीच्या अंकात भारिप नेते यांच्या वाढदिवसाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात बाजार समितीचे कोठेही वैशिष्टय किंवा उल्लेख नाही या जाहिरातीचे बिल उपसभापती निलेश दिपके यांच्या नावाने 10 हजार 626 रुपये बिल काढण्यात आले आहे. सभापती व सचिव यांनी भ्रष्टाचार करण्याच्या उदद्ेशाने खोटे दस्तवेज तयार करुन, षडयंत्र रचुन साप्ताहिक समाजनिष्ठा या वृत्तपत्राला सर्वाधिक जाहिराती दिल्या आहे.

कोणत्याही कायदेशीर सभेची मान्यता न घेता सभापती व सचिव यांनी वृत्तपत्रांना बेकायदेशीर जाहिराती देउन मोठया प्रमाणात अपहार केला आहे. वृत्तपत्राच्या जाहिरातींवर तब्बल 17 लक्ष रुपयांचा खर्च झाला असून या खर्चाची चैकशी होणे गरजेचे आहे. बाजार समितीचे आर्थिक नुकसान करुन अपहार केल्याबदद्ल सभापती,सचिव व ठरावाच्या बाजुने असलेले संचालकासह सर्व व्यक्तींवर चैकशीअंती भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्यांचेवर भारतीय दंड विधानाचे कलम 406, 408,420, 465, 468,477(अ)120 (ब) व 34 इतर कलमान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारकत्र्यांनी चैकशी अधिकाÚयांकडे केली आहे. या चैकशीमुळे खामगांव कृ.उ.बा.स.च्या क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण झाली असुन अनागोंदी व नियमबाहय काम करणाÚया सभापती व सचिवांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.