नाशिक् येथे विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न

32

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21सप्टेंबर):-सालाबादाप्रमाणे निलगिरी बाग ,औरंगाबाद रोड, पंचवटी ,नाशिक येथे विश्वरत्न बौद्ध विहार येथे वर्षवासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाची सांगता दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी विश्वरत्न बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.साहेबराव वाळवंटे , सचिव श्री. संतोष वाळवंटे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश साळुंके हे देखील उपस्थित होते. वार्तापत्र शोधांश पत्रकार यांचे मुख्य संपादक डॉ.राजेश साळुंके यांनी धम्मदेशनापर उपस्थितांना मोलाचे व उत्कृष्ट मार्गदर्शन केले .प्रत्येक धम्म बांधवांनी वर्षवास हा नियमितपणे करावा व बौद्ध विहारात जाऊन मनाच्या शांतीसाठी विपश्यना करावी , त्यामुळे आपल्या वैवाहिक व संसारिक जीवनामध्ये आपणाला निश्चितच फायदा होईल. असे मत डॉ.राजेश साळुंके यांनी धम्मदेशनापर मनोगतात व्यक्त केले .बौद्ध आणि त्याचा धम्म हा तीन महिने प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये वाचन करावे असे आवर्जून सर्वांना विनंती केली.

यावेळी विनंतीचा मान ठेवून सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी यांनी मान्य केले की आम्ही देखील अशाच प्रकारचे बुद्ध आणि त्याचा धम्म आमच्या घरी प्रत्येक वर्षी वर्षवास साजरा करू असे आश्वासन दिले आणि सौ. सुचिताताई साळुंके यांनी देखील धम्मदेशना देऊन महिलांना वर्षावास आपापल्या घरी कसा करावा व त्याचे फायदे सर्वांना समजून सांगितले. प्रत्येकाने विहारात व आपल्या घरी वर्षवास आवर्जून करावा. त्याचे शारीरिक ,मानसिक व कौटुंबिक कसे फायदे होतात हे देखील यांनी सर्वांना अनुभवातून सिद्ध करून सांगितले . सर्व महिलांनी आम्ही देखील अशाच प्रकारचा वर्षवास आपल्या घरी प्रत्येक वर्षी करू असे आश्वासन दिले तसेच ऋणानुबंधन महिला व पुरुष हक्क संरक्षण समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा सौ. सुचिता साळुंके हजर होत्या.वर्षवास समाप्ती प्रसंगी दहावी आणि बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी विश्वरत्न बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.यासाठी मोलाचे सहकार्य महिला आघाडीच्या सौ.अलकाताई शिंदे तसेच सौ बबीता वाळवंटे आणि रेखाताई दीपके व इतर अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते .