अवैधपणे दगड उत्खनन करून वाहतूक करतांना ट्रॅक्टर पकडले – काटेपल्ली येथील घटना

78

🔹राजरोसपणे रेती व दगड उत्खनन करीत असल्याची परिसरात जोरदार चर्चा

🔸उपसरपंच वैभव कंकडालवार यांचे कारनामा

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.22सप्टेंबर):- नजीकच्या काटेपल्ली येथे सोमवार 21 सप्टेंबर रोजी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी अवैधपणे जंगलातुन दगड उत्खनन करून वाहतूक करतांना ट्रॅक्टर पकडले असून दंडात्मक कार्यवाहीसाठी ट्रॅक्टर अहेरी तहसील कार्यालयात जप्त केले आहे. ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचे असून MH 33 T 9898 या क्रमांकाची आहे.

सदर ट्रॅक्टरवर जंगलातुन अवैधरित्या दगड(बोल्डर) आणतांना पकडले असता ट्रॅक्टर चालक अक्षय आत्राम यांनी सदर दगड इंदारामचे वैभव कंकडालवार यांच्याकडे वाहतूक करीत असल्याची कबुली दिली असून वैभव कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे भाऊ असून ते स्वतःही इंदाराम ग्राम पंचायतीचे उपसरपंच आहेत.

एका सिमेंट रोडच्या बांधकामासाठी अवैधपणे दगडाचे उत्खनन करून वाहतूक करीत होते असे समजले असून मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे अवैध रेती व दगडाचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पहिल्यांदा या गोरखधंदावर चपराक बसल्याचे बोलल्या जात आहे.