उमेद अभियानातील महिला व कर्मचारी याची उपजीविका अभियान बाह्य यंत्रणेकडे जात असल्याने आली धोक्यात

    45

    ✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुसद(दि.23सप्टेंबर):-सण २०११ पासून राज्यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान ,उमेद कार्यरत आहे.पुसद मध्ये २०१७ मध्ये उमेद अभियान सुरू झाले, ग्रामीण भागातील महिलाना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करून त्या कुटुंबाला उपजीविका मिळून देणे हे अभियानाचे काम आहे. दारिद्र्य दूर करण्याच्या उधिष्ठाने हे अभियान सुरू केले. त्यानुसार राज्यात ५० लक्ष महिला अभियानाशी जोडून आहेत .व पुसद तालुक्यामध्ये २७ हजार महिला अभियानात आहेत.

    एवढे असताना शासनाने १० सप्टेंबर रोजी एक पत्र काढून ज्या कर्मचारी याची सेवा समाप्त झाली त्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये असे सांगितले .त्यामुळे अनेक कर्ममचारी याना कार्यमुक्त केले आहे. आणि सदर अभियान बाह्य यंत्रणेला देऊन अभियानात बदल करणार आहेत .यामुळे सदर बातमी महिलांनी सोशल मीडियामध्ये बघून पुसद तालुक्यातील आमदार माजी आमदार मनोहरराव नाईक ,तालुका उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

    महिलांनी निवेदन देताना सांगितले अभियान मध्येबदल झाल्यास आंदोलन मोठया प्रमाणात करण्यात येईल .आदरणीय मनोहरराव नाईक यांनी दोन दिवसात पाठपुरावा करून कळवतो असे आश्वासन दिले. यावेळी उमेदचे कर्मचारी व अधिकारी राहुल देशमुख , गौरव कांबळे , दिगंबर राठोड ,प्रशांत पोपळघट ,व सर्व महिला कॅडर उपस्थित होत्या.