हिंगोलीमध्ये खाजगी कोरोना रुग्णालयाच्या उभारणीला नागरिकांचाच विरोध

23

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.26सप्टेंबर):- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णावर शासकीय यंत्रणेच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही खाजगी कोरोना रूग्णालय नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये खाजगी कोरोना रुग्णालय सुरू होत आहे.

परंतु हे रुग्णालय वसाहतींमध्ये असल्या कारणाने आजू बाजूच्या लोकांना कोरोनाचा त्रास होईल, त्यामुळे या परिसरात हे कोव्हीड रुग्णालय नको, असा पवित्र तेथील नागरिकांनी घेतला आहे.