धर्मपुरी फाट्यावर भीषण अपघात मोटर सायकलसवारी जागेवर ठार

39

‌‌✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.28सप्टेंबर):-धर्मापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला असून मोटारसायकलस्वार जाग्यावर ठार झाल्याची घटना आता .६. ५० ‌ वा. घडली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

धर्मपुरी फाट्याजवळ एक मोटारसायकल स्वार जात असताना गाडी स्लीप झाली आणि खाली पडून व पाठीमागून येणाऱ्या मोठ्या वाहनाची धडक बसून या या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार जागीच गतप्राण झाला. मयत नांदेडचा असल्याचे प्रथमदर्शनी समजते.

ग्रामीण पोलीसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पूर्ववत केली. मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.