रयत शेतकरी संघटनेच्या युवक बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रदीप भाऊसाहेब झोडगे यांची नियुक्ती

    36

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    गेवराई(दि.28सप्टेंबर):-रयत शेतकरी संघटना बळकट व मजबूत करण्यासाठी व शेतकरयांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट बापुसाहेब देशमुख यांच्या आदेशाने व सुनील भाऊ ठोसर बीड जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राम नवले पाटील बीड तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीत काल रयत शेतकरी संघटनेचे युवक बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रदीप भाऊसाहेब झोडगे यांची निवड करण्यात आली.

    शेतकरी माय बापांच्या अडचणी साठी जिवाच रान करून शेवटच्या शेतकरी व सामान्या माणसापर्यंत पोहचण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत करीन असे झोडगे यांनी सांगितले यावेळी बब्रुवान नवले सर्वदाय युवा फाऊंडेशन, आशिष जाधव, निखील रेड्डी, वैद्य सर, चंद्रसेन जाधव नाळवंडी सर्कल प्रमुख, प्रदीप सुरवसे बीड शहर अध्यक्ष यांची उपस्थिती होती झोडगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.