🔹अन्यथा संपूर्ण गायरानधारकांसह अमर्यादित काळासाठी धरणे आंदोलन करु.- विशाल भैय्या धिरे

✒️नवनाथ पौळ(केज,विशेष प्रतिनिधी)
मो:;८०८०९४२१८५

केज(दि.29सप्टेंबर):-लांडेगाव येथील गेली पंचवीस ते तीस वर्षे कसत असलेल्या गायरान जमिनीवरील पिकांची एक ई ला नोंद घ्या अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी लाडेगांव शाखाने दिला आहे.

दि२८ सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील लाडेगांव येथील गेली पंचवीस ते तीस वर्षे कसत असलेल्या जमिनीवरील यावर्षीच्या पिकांचे तात्काळ दोन दिवसांच्या आत पिक पंचनामे करुन अतीक्रमण नोंद वही( एक ई) ला नोंद करुण घ्यावी या प्रमुख मागणीसाठी लाडेगांव येथील गायरान जमिन प्रकरणात वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे व प्रा. शिवराज बांगर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली केज तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन ३०/०९/२०२० रोजीच्या तहसिल कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते अजयजी भांगे सर,जेष्ठ नेते धनराज सोणवणे,वंचित बहुजन आघाडी केज चे बाबासाहेब मस्के, रणजित घाडगे सर, नवनाथ पौळ,विशाल धिरे केज शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह मौजे लाडेगाव येथील गायरान धारक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED