✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.28सप्टेंबर):-अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने विभागीय प्रमुख,जिल्हा समनव्यक व तालुका समनव्यक यांना निवड प्रमाणपत्र वितरण सोहळा कोरोन 19 जागतिक महामारीच्या संकटामुळे ऑनलाईन पद्धतीने निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला.अग्निपंख फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन व उपक्रम शील शिक्षकांचे उपक्रम संपुर्ण देशातच नवे तर विदेशात शुद्धा पोहचविण्यासाठी तसेच विध्यार्थीचे हित जोपासन्यासाठी हे फाउंडेशन अविरत कार्य करीत आहे .अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे कार्य हे फाउंडेशन करीत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ओंकार चेके अध्यक्ष निवड समिती,प्रमुख पाहुणे मा.गजानन गोपेवाड राज्य समनव्यक जयश्री सिरसाटे महिला राज्य समनव्यक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते निवड पत्र प्रदान करण्यात आले. गोपेवाड सरांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचार व अग्निपंख ग्रुपचे महत्त्व,उद्देश आणि करावयाचे कार्य अगदी प्रभावशाली शब्दात व्यक्त केले.आपण जन्माला आलो तेव्हा या मानव जाती करिता निस्वार्थ भावनेने पुढे कसे जात येईल त्यांनी सुंदर शब्दात व्यक्त केले.डॉ.कलाम यांचे आदर्श समोर ठेवून विद्यार्थी घडवाचे असे आव्हान गजानन गोपेवाड सरांनी केले जयश्री मॅडम यांनी सुध्दा प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मा.बालाजी माने,सूत्रसंचालन नारायण भिलाने यांनी अतिशय प्रभावी पणे केले.सरतेशेवटी कार्यक्रमाची सांगता मीनाक्षी राऊत यांनी केली.हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने मोठ्या आनंदाने सुमारे तीन तास चालला.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED