भारतीय भटके विभक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघात विजय कांबळे यांची “मुंबई प्रदेश संघटक” पदी नियुक्ती

75

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.29सप्टेंबर):-भारतीय भटके विभक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासं घाचे संस्थापक स्व. आसाराम गुरूजी यांच्या आशीर्वादाने तसेच संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अशोक धनगावकर यांच्या महासंघात श्री.विजय कांबळे यांना समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर “मुंबई प्रदेश संघटक” पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. या समावेशाने आता संघात त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे.

आपले बुध्दिकौशल्य व लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा जनहित, राज्य व राष्ट्रीहित जोपासून लोकशाही दृढ, निकोप व संघटनेचे नाव उज्ज्वल करतील. त्यांच्या या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. या निवड केल्याबद्दल संस्थापक व कार्यकारी सदस्यांचे आभार मानले आहे.