✒️ विजय कांबळे(पैठण प्रतिनिधी)मो:-8454021607
पैठण(दि.1ऑक्टोबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पैठण महिला अध्यक्ष सौ.अनिता वानखेडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. जायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस शेतकरी बांधवाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. तसेच त्यांना ऊस माल सडण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पैठण मधील शेतकरी बांधवाना ह्या नुकसानी समोर जावं लागेल. तसेच सौ. अनिता वानखेडे ह्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अजून एकदा पुढे सरसावले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवाचे ऊस मालाचे सडण्याचे नुकसान टाळता येईल. आधिच जास्त प्रमाणात अतिवृष्टीमुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. या प्रसंगी जर आपण साखर कारखान्यातील परिसरातील ऊस धारक शेतकर्याचं ऊसाचा माल प्राधान्याने खरेदी करण्याचे जर निर्देश दिले तर ऊस सडण्यापासून होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. असे सौ. अनिता वानखेडे आपल्या निवेदनात म्हटले आहे.