‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ याचे भान ठेवून नागरिकांनी कोरोना वर मात करण्यासाठी त्रिसुत्रांचा वापर करावा

75

🔸जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते माहिती रथाचे उद्घाटन

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑक्टोबर):-क्षेत्रीय लोक संपर्क कार्यालयाच्यावतीने कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती रथाच्या माध्यमातून जागोजागी जनजागृती होणार आहे. याबरोबरच ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ याचे भान ठेवनू प्रत्येक नागरिकाने ऑक्सिजन व व्हेंटीलेटर मास्क लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर कापडाचा मास्क वापरावा, रेम्डिसीविर व इतर औषधांची गरज पडू द्यायची नसेल तर सानीटायझर अथवा साबणाने हात धुवावे तसेच कुंटुबापासून दूर जायचे नसेल तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या त्रिसुत्रांचा वापर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपण कोरोनाची लढाई जिंकू, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात क्षेत्रीय लोक संपर्क कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कोरोना जनजागृती अभियान या माहिती रथाचे हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उद्घाटन हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी पराग मांडले व कलापथकाचे कलाकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, कोरोनासारख्या विषाणूशी लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासन व प्रशासनाला सहकार्य करावे. त्यासाठी प्रत्येकाने सक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच वारंवार हात व सुरक्षित अंतर या नियमांचे पालन कटाक्षाने करावे. कोरोनासारख्या विषाणूला जर आपण बळी पडला तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे असून पुर्व परिस्थिती तयार करण्यासाठी त्याला ‘कंट्रोल झेडचे’ बटनही नाही त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले.

कोरोनासारख्या विषाणूशी लढण्यासाठी समाजात वावरणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी काळजीचे स्वरुप वेगवेगळे असून प्रत्येकाने काम करतांना आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी आपल्या स्तरावरनियम तयार करून स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच कोरोनाकाळात प्रत्येक व्यक्तीने नकारात्मकतेकडे न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहीजे असेही श्री.मांढरे यांनी सांगितले.