🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑक्टोबर):-निफाड तालुक्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिकांचे मोठे नुकसान झालेले असून तालुक्यातील काढायला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .तसेच कांदा शेतात पाणी साचल्याने कांदा सडला आहे. तर भुईमूग व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे.

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी निवेदना मार्फत तहसीलदार साहेब यांना करण्यात आली.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शैलेश शेलार ,तालुकाउपाध्यक्ष केशव काका वाघ, उगाव गट अध्यक्ष प्रमोद भाऊ मापारी, मनविसे तालुकासरचिटणीस संग्राम दाभाडे, अनिल वाघ,ता चिटणीस जयेश ढिकले, संदीप दराडे, अप्पा व्यवहारे,आदित्य कहाने आनंदा नागरे उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED