मराठी साहित्य मंच मध्ये करण्यात आला ऑनलाईन ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

30

🔹काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) यांच्या संकल्पनेतुन अप्रतिम नियोजन

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.2ऑक्टोबर):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण साहित्य समूहात समूहाचे सर्वेसर्वा राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)यांच्या संकल्पनेतून दि.१ ऑक्टोबर२०२० रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून “आधार”या विषयावर काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच साहित्य मंच मध्ये असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, कवी,कवयित्री यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)यांनी आगळ्या-वेगळ्या ऑनलाईन ज्येष्ठ नागरिक/साहित्यिक विशेष सन्मान सोहळ्याचे साहित्य समूहात आयोजन केले होते.

या सोहळ्यासाठी, समुह संस्थापक अंगदजी दराडे,समुह प्रशासक, नंदकुमार शेंदरे, सौ.शालू विनोद कृपाले(गोंदिया),ज्येष्ठ कवयित्री विजया शिंदे(कल्याण), कवयित्री रुपाली चौधरी(धुळे) यांचे सहकार्य लाभले, या सन्मान सोहळ्यात, ज्येष्ठ कवयित्री रजनी अ. पाटील(खारघर),पुष्पा निराळी (संगमनेर), कल्पना म्हापुसकर(मीरारोड),रत्ना भोरे(बंगलोर), मीना सानप(बीड),नलिनी पवार(पुणे),सीमा भंडारे,(पुणे),कविता वालावलकर (कर्नाटक),मंजुश्री शिवाजी वाळुंज(अहमदनगर),रजनी राज आहेरराव,सौ.सुलभा कुलकर्णी,किशोरी शंकर पाटील, कलानंद जाधव (हिंगोली),सुभाष महाराज बडधे,बेलापूरकर, शोभा वागळे (मुंबई), रामकृष्ण दशरथ नागरगोजे(बीड),शीला पाटील,(चांदवड) या साहित्यिकांचा आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र देऊन शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ,नियोजन, सूत्रसंचालन काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर यांनी केले.

जेष्ठ साहित्यीकांचा सन्मान करून मराठी साहित्य मंच समूहाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवल्याचे साहित्य क्षेत्रातील मान्यवर कवी कवयित्री यांच्याकडुन कौतुक होत असून अनेकांनी समूहात लेखी अभिप्राय दिले आहेत.