प्रत्येक गावाचा पीक आराखडा लवकर तयार करावा; जिल्हाधिकारी

34

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.2ऑक्टोबर):-जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार केला जावा यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्यात यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृती आराखडा याबाबत बैठक रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, क्रॉप पॅटर्न तयार करताना सदर गावांमध्ये होणारे कृषी उत्पादन त्यांचे प्रकार एकूण उत्पादन हंगामनिहाय घेण्यात येणारे पीक पद्धती यांची माहिती असावी जिल्ह्यातील हा क्रॉप पॅटर्न तयार झाल्यानंतर याचा उपयोग शेतकऱ्यांना आणि आणि कृषीमाल खरेदी करणाऱ्या कृषी आधारित उद्योगांना होईल आवश्यक दर्जा आणि होणारे पीक उत्पादन याची माहिती मिळाल्यामुळे कृषी मालाला अधिक दर मिळू लागेल या क्रॉप पॅटर्न ची माहिती वेबसाईट द्वारे आणि पुस्तिके द्वारे उपलब्ध करून देता येईल.

ते म्हणाले सेंद्रिय शेती कडे वाटचाल करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्याची परिणामकारकता तपासली जावी याचा उपयोग सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी गटांना देण्यात येणारा प्रशिक्षण दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येईल करता येईल या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ क्लिप्स तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुलभ व सोपे करण्याचा प्रयत्न केला जावा असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.