उत्तरप्रदेश की अपराध प्रदेश? – सीबीआय चौकशीची केली मागणी

28

🔸अंत्यविधीचे सोपस्कार आधीच केल्याने त्या मुलीला कोरोना होता असा जावई शोध लावा!

🔹राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहीन भाभी हकीम यांनी युपी सरकारवर तोफ डागले

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.2ऑक्टोबर):- उत्तर प्रदेशात वारंवार मुली व महिलांवर अन्याय-अत्याचार होत असल्याने उत्तर प्रदेश की अपराध प्रदेश अशी म्हणण्याची नामुष्की वेळ आली असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम यांनी करून यूपी सरकारवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून तोफ डागले.

उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना दुर्देवी व निंदाजनक असून प्रकरण सीबीआय कडे सोपवून शीघ्र गती न्यायालयात प्रकरण वर्ग करून तात्काळ पीडित कुटुंबियांना योग्य न्याय आणि त्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची तीव्र मागणी सुद्धा शाहीन हकीम यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

अभिनेत्री कंगनाच्या अवैध बांधकामाचे छत पाडले तर हिमाचल प्रदेशातील भाजपा सरकार कंगना रनौत एक महिला म्हणून कंगनाच्या मदतीला वेळीच धावून आले नव्हे; वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करून महिलांचे नक्कीच सन्मान वाढविले पण त्याच भाजपा सरकारातील उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मृतक मुलीची अंत्य विधी पोलिसांच्या हातून निपटायला लावून विडंबनेचा कळस गाठला असून जमल्यास त्या निरागस मुलीला कोरोना निघाला होता असा जावई शोधही लावा त्यामुळे “ना रहेगी बास, ना बजेगी बासरी” अशी बोचरी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाहीन हकीम यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

उत्तर प्रदेशात आता योगी सरकार गुंडांचे व अपराधीचे साम्राज्य वाढवीत असून योगी सरकारच्या हाथरस येथील दुर्दैवी घटनेच्या आधीच्या व आताच्याही घटनाक्रमात विविध संशयास्पद भूमिका आपोआप बाहेर येत असल्याने आता त्या निरागस मुलीवर नराधमांनी अन्याय – अत्याचार केले की नाही याच्या तपासणीसाठी कुठल्याही यंत्र व तंत्राची गरज भासणार नसल्याचे दिसून येत असून मृतक मुलीला व मुलीच्या परिवाराला योग्य न्याय व नराधम आरोपींना नक्कीच कठोरातील कठोर शिक्षा मिळणार असल्याचे आणि योगी सरकारची गोची होणार असल्याचेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोठ्या आत्मविश्वासाने शाहीन हकीम यांनी म्हटले आहे.