काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची निवड

  40

  ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

  परळी वैजनाथ(दि.4ऑक्टोबर):- येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विठ्ठल साखरे यांची परळी तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. विठ्ठल साखरे यांना तालुकाध्यक्ष अँड. अनिल मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

  परळी तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी प्रा.एस. एल.देशमुख यांच्या निवासस्थानी नुकतीच जाहीर करण्यात आले व नियुक्ती पत्र देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार व जम्मू-कश्मीरच्या प्रभारी तथा अ.भा.काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी सदस्या रजनीताई पाटील, राज्याचे माजी मंत्री अशोकराव पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, बीड जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या आदेशानुसार परळी तालुकाध्यक्ष अँड.अनिल मुंडे यांनी तालुका उपाध्यक्षपदी मांडवा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विठ्ठल साखरे यांची निवड करण्यात आली आहे.

  विठ्ठल साखरे हे अतिशय सामान्य कुटुंबातील व कोणताही राजकीय वारसा नसलेल्या काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन काँग्रेस पक्षाने वीस वर्षे एका निष्ठेने काम करणारे विठ्ठल साखरे यांच्या कार्यास न्याय दिला आहे . त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून  परळी तालुक्यातील जनतेमध्ये,व काँग्रेस प्रेमी मध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

  काँग्रेस पक्षाने केलेली सर्वसामान्यांसाठी केलेली लोकउपयुक्‍त कामे तसेच काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांत पोहचविणे हे माझं कर्तव्य आहे तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल साखरे यांनी आभार मानले आहेत .