भाजपा कोरपणा तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आदोंलन

35

🔸कृषी विषयक कायद्यानां राज्यसरकारने दिलेली स्थगती त्वरित दुर करा- नारायण हिवरकर (भाजपा अध्यक्ष ता. कोरपणा यांची मागणी)

 ✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.7ऑक्टोबर):-नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्‍त आणि दलालांच्‍या जोखडातून मुक्‍त होणार असून आपल्‍या कष्‍टाने पिकविलेल्‍या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्‍यांना स्‍वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्‍याही परिस्‍थीतीत बंद होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्‍वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्‍थगिती दिली आहे.

ही स्‍थगिती त्‍वरीत उठवावी व राज्‍यात केंद्राच्‍या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्‍ही करीत असल्‍याचे प्रतिपाद श्रीनारायण हिवरकर यांनी केले आहे.

कोरपणा बस स्टॉप येथे महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आंदोलन करण्‍यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में, स्‍थगिती रद्द करा शेतक-यांना न्‍याय द्या, महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम, कृषी विधेयकांची राज्‍यात अंमलबजावणी करा, महाविकास आघाडी नव्‍हे तर महाबिघाडी अशा घोषणांचे फलक फडकावत राज्‍य सरकारचा निषेध केला.

या वेळी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन घेण्यात आले या वेळी श्री संजयभाऊ मुसळे,श्री पुरूषोत्तम भोंगळे,श्री अरूण मडावि,श्री किशोर बावणे,श्री निलेश ताजेने,श्री रमेश मालेकर,श्री अरूण डोहे,श्री हरीभाऊ घोरे,श्री अमोल आसेकर,श्री संदीप शेरकी,श्री शशीकांत आडकीने,श्री ओम पवार युवा मोर्चा,दिनेश खडसे,श्री विनोद नवले,श्री पद्माकर दगडी,श्री विनोद कुमरे,श्री तुडसिराम डोहे आदी एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन तहसीलदर साहेबांना सादर केले.

आंदोलकांच्‍या भावना शासनापर्यंत पोहचविण्‍याचे आश्‍वासन तहसीलदार साहेबांनी शिष्‍टमंडळाला दिले. या आंदोलनात सोशल डीस्टनसिंग पाळत भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.