✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.8ऑक्टोबर):–तालुका/शहर भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाच्या वतीने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या समोरील आवारात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयक मंजूर करुन शेतकरी बांधवांना प्रस्थापितांच्या जाचातून मुक्त करण्याचे काम केले आहे.

शेतकरी उत्पादन,व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक 2020 या राष्ट्रीय कृषी विधेयकांना राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने राजकिय विरोध म्हणून काल केंद्रिय कृषी सुधारणा विधेयकाच्या विरुध्द अध्यादेश काढून स्थगिती,बंदी घातली आहे..वास्तविक हे कृषी सुधारणा विधेयक शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे आहे.

म्हणून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व प्रदेश किसान मोर्चा यांच्याकडून शेतकर्‍यांच्या हितासाठी हे कृषी विधेयक ऐतिहासिक व महत्वाचे आहे,हे कृषी विधेयक महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारने लागू करावे व ही स्थगिती उठवावी म्हणूनतहसीलदार यांना या बाबत निवेदन देण्यात आले,व हा अन्यायी बंदीचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली..

तसेच उपस्थित पदाधिकार्‍यांकडून या स्थगित अध्यादेशाची होळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील आवारात करण्यात आली..यावेळी चोपडा पं.स.मा.सभापती आत्माराम म्हाळके,उ.महाराष्ट्र ओ.बी.सी.आघाडी अध्यक्ष प्रदिप पाटील,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,युमो शहराध्यक्ष तुषार पाठक,चोपडाशेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पाटील,भरत पाटील,उपाध्यक्ष विनायक पाटील,योगराज पाटील,प्रविण चौधरी,ता.सरचिटणीस हनुमंतराव महाजन,सुनिल सोनगिरे,ता.चिटणीस भरत सोनगिरे,जेष्ठ पदाधिकारी कांतिलाल पाटीलसर,लासुर विकास सोसा.चेअरमण विठ्ठल पाटील , ता.सरपंच संघटना अध्यक्ष रावसाहेब पाटील,शहर ओबीसी आघाडी उपाध्यक्ष कैलास पाटील,गोपाल पाटील,सागर पाटील,प्रशांत देशमुख,अक्षय सुर्यवंशी,कार्यालय मंत्री मोहित भावे..इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी बांधव सोशल डिस्टन्शिग नियमाचे पालन करुन उपस्थित होते..

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED