उत्तर प्रदेश येथील हाथरस अत्याचार प्रकरणाचा निषेध

26

✒️धानोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धानोरा(दि.8ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा जाहीर निषेध तालुका धानोरा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळेस तालुका दंडाधिकारी साहेब, तहसील कार्यालय धानोरा यांच्या मार्फत मा. महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.

हाथरस घटनेसंबंधी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारने चालवलेली दडपशाही व दंडूकशाही अत्यंत खालच्या थराचे असून लोकशाही करीता अत्यंत धोकादायक आहे. गोरगरिबांप्रती, दलीतांप्रती, पिडीतांप्रती, संवेदना प्रकट करणाऱ्या ढोंग करणाऱ्या केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचे पितळ उघडे पडलेले आहे.

बलात्कार सारखा गंभीर गुन्हा घडला असताना कोणतीही चौकशी न करता, कुटुंबाला विश्वासात न घेता, कुटुंबाला पीडितेचे अंतिम दर्शन न घेऊ देता, परस्पर रात्री दोन वाजता पिडीत मुलीवर अंत्यसंस्कार करून संबंधित घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पत्रकारांना प्रश्न करू देत नाही तसेच कुटुंबियाला भेटण्याची परवानगी सुध्दा देत नाही.

विरोधी पक्षातील नेते त्या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता, त्यांचावर अमानुषपणे लाटीहल्ला करून धक्काबुक्की करण्यात आली. हे योग्य नसून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.

यावेळेस मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गड, राजु जिवानी सदस्य जिल्हा परिषद, विनोद लेनगुरे सदस्य जिल्हा परिषद, गजानन दुगा माजी सदस्य जिल्हा परिषद, लालाजी परसा उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस, चंदू पाटील किरंगे माजी सदस्य प.स, परसराम पदा माजी सदस्य प.स, मुबारक सय्यद कॉंग्रेस नेते, कुलदीप इंदुरकर उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस, सदाशिव येरमे नगरसेवक, समीर भाई कुरेशी नगरसेवक, शारिक भाई शेख, महेश भाऊ चिमुरकर, नरेश जी भैसारे, जमीर भाई कुरेशी विधानसभा महासचिव, मिलिंद भाऊ कीरंगे भूषण भाऊ भैसारे, संजय कुलमेथे उपसरपंच सालेभट्टी, प्रशांत कोराम अध्यक्ष युवक कॉंग्रेस, केसरी पाटील उसेंडी माजी सरपंच फुलबोडी, रावजी परसे तलोधी, शिवराम पाटील उसेंडी, संजय गावडे, तसेच शेतकरी वर्ग व तालुक्यातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.