येवला रेल्वे स्थानकाचे मुक्तीभुमी रेल्वे स्थानक करा

  43

  🔹ऑल इङिया पॅथंर राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांची मागणी

  ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

  नाशिक(दि.8ऑक्टोबर):-ऑल इंडिया पॅथंर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी येवला येथे धावती भेट दिली येवला ही आबेङकरी चळवळी चा बाल्लेकिल्ला व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धर्मातंर घोषणा केलेल्या पावन मुक्तीभुमी वर भेट देवुन अभिवादन केले.

  यावेळी येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘‘मुक्तीभूमी’’ करण्यात यावे या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी येवला रेल्वे स्थानकाचे डीआरएम यांना दिले. तात्काळ या प्रकरणी राज्य व केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास पॅंथर स्टाईलने रेल्वे स्थानकाचे नामांतर केल्या जाईल असा इशारा यावेळी केदार यांनी दिला आहे.

  यावेळी प्रशांत पडवळ, राजु भाई गायकवाड़ आकाश पडवळ,जीवन पडवळ,सचिन कसबे,अर्जुन पडवळ,प्रशांत संसारे,विकी पडवळ,सह शहर व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.