🔺संभाजी ब्रिगेडचा आरोप

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-८०८०९४२१८५

केज(दि.8ऑक्टोबर):- येथील उपजिल्हा रुग्णालय हे अधिकारी आणि डॉ च्या मनमानी कारभारावर चालू असल्याचे संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केज उपजिल्हा रुग्णालयात एखाद्या रुग्णाचे कोव्हीड19 चे स्वाब घेऊन तपासणीसाठी पाठवले असता ते जर निगेटिव्ह आले तर त्या व्यक्तीला कितीही त्रास होत असेल किंवा अन्य आजार असतील तर त्या व्यक्तीस उपचार किंवा ऍडमिट करून घेतलं जात नसून केजचे उपजिल्हा रुग्णालय हे फक्त रेफर सेंटर बनले आहे पेशंटचा आजार जरा जरी जास्त असेल तर इथे विलाज होत नाही.

जाऊ द्या अंबाजोगाई ला आशा पध्दतीने रुग्णांशी व्यवहार केला जातो ही रुग्णांची होणारी फरफट बंद करण्यात येऊन केज येथे चांगल्या प्रकारे उपचार करण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, संदीप शितोळे,संजय लोंढे,गजानन गायकवाड,योगेश थोरात,सुरज सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED