🔹भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी निवेदनाव्दारे सा.बा.विभागाकडे मागणी

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.8ऑक्टोबर):- परळी शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. विविध ठिकाणीच्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.  त्यामुळे नागरिक व वाहन धारकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरी तालुक्यातील रस्त्यावर खड्डे तात्काळ बुजवावे अशा मागणीचे निवेदन भाजयुमोच्या वतीने सा.बा.विभाग यांना देण्यात आले आहे. दरम्यान उपकार्यकारी अभियंता संजय मुंडे यांनी निवेदन स्विकारले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी शहरातील व तालुक्यातील तसेच अनेक मुख्य रस्ताची अनेक जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. तसेच आठ ते दहा गावांची वाहतूक मोठ्या प्रमाणात याच रस्तावरून रहदारी आहेत. या मोठ्या प्रमाणात रहदारी असणाऱ्या रस्ताची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.  या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याचे तीन तेरा वाजले. वाहनचालक व नागरिकांतून संताप व्यक्त होत केला जात आहे.

कामाच्या दर्जाबाबत चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. परळी शहर व तालूक्यात रस्ते अतीशय खराब व जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत, यामुळे परळी शहर व परळी तालूक्यात आपघाताचे प्रमाण खुपच वाढलेले आहे. मागीलआठवड्यात धर्मापुरी फाटा व सारडगाव येथे खड्डे असल्यामूळे दोन युवकाचा अपघाताने मृत्यू झाला. तरी आपणास विनंतीपूर्वक सुचणा करण्यात येते की आपण रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम त्वरीत करावे जेणे करून आपघाताने कोणाचा जीव जाणार नाही.

तसेच यापुढे रस्त्यातील खड्यामुळे अपघात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार आपण असाल, सदरील बाबीची दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ही भाजयुमोच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, संतोष सोळंके, गणेश होळंबे, बाळासाहेब फड, चौतन्य मुंडे, दिपक नागरगोजे, अमोल वाघमारे, दिपक गित्ते, अशिष कदरे, सतिष मुंडे इंदवाडीकर हे उपस्थित होते. दरम्यान शहरातील व तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपायुमोचे नुतन जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED