वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने वनविभागाला निवेदन

  40

  🔹दोन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे वननिरीक्षक गलगटांचे आश्वासन

  ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

  राजुरा(दि.9ऑक्टोबर):- तालुक्यातील वनक्षेत्र प्रभावित असलेल्या विरूर क्षेत्रात वाघाने धुमाकूळ माजवला आहे, परिसरातील 8 शेतकऱ्यांना वाघाने ठार केले आहे. अश्यातच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे राजुऱ्यात आले असता वनविभागाला निवेदन देऊन त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित विषयावर वनविभागाने येत्या दोन दिवसात जेरबंद करू असे आश्वासन देण्यात आले.

  याप्रसंगी ऊपजिल्हाप्रमुख धनंजय छाजेड
  माजी ऊपजिल्हाप्रमुख बबनभाऊ ऊरकुडे, शिवसेना नगरसेवक राजुभाऊ डोहे, युवासेना ऊपजिल्हाप्रमुख प्रनित अहिरकर , विधानसभा संघटक नरसिंग मादर, शहरप्रमुख अक्षय गोरे, निलेशभाऊ गम्पावार,ऊमेश गोरे, रमेश झाडे उप तालुका प्रमुख,बंटी मालेकर उप तालुका प्रमुख , आसिफ शेख, स्वपनिल मोहुर्ले, मोनु सुर्यवंशी, समीर शेख, आकाश बकाने, वासुदेव चापले उपसरपंच मंगी, रमेश भाऊ पेटकर सरपंच सास्ती, वसिमभाई अन्सारी, नबी पठान, मंगेश दुर्गे, बाळु कुईटे,ऊमेश गोरे, महिला ऊपजिल्हाप्रमुख सरीताताई कुडे, वर्षा पंदिलवार, दिपाली बकाने ऊपतालुका प्रमुख, कलावती ईदुरवार विभाग प्रमुख, सुनिता जगदाळे विभाग प्रमुख, पार्वतीबाई तलांडे आदिवासी ऊपतालुका प्रमुख, शकुंतला क्षिरसागर, आशाताई ऊरकुडे आणि समस्त शिवसैनिक युवासैनिक, महिला कार्यकर्ते, उपस्थित होते.