हाथरस येथील पिडीतेस न्याय द्या अन्यथा देशभर तिव्र आंदोलन करणार

39

🔹जनशक्ति युवा संघटना पिंपरी-चिंचवड शहर चा इशारा

✒️पिंपरी-चिंचवड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी- चिंचवड(दि.9ऑक्टोबर):-उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुक्सलीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत काही नराधमांनी अतिशय अमानवीय कृत्य केले आहे.दिल्ली येथे उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवडिलांच्या गैरहजेरीतच पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

ही अतिशय घृणास्पद घटना असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे व सरकार नावाच्या यंत्रनेचा गुंडांना कोणताही धाक राहिलेला नाही हे दिसून येते.त्यामुळे खुलेआम असे प्रकार दिवसाढवळ्या घडत असून महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे.आम्ही जनशक्ति युवा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड नायब तहसीलदार श्री विजयकुमार चोबे यांना निवेदन देण्यात आहे.

या अमानवी घटनेचा जाहीर निषेध करीत असून या प्रकरणातील आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.महिला ही कोणत्याही जातीधर्मातील असो तिचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे.तिथे जातधर्म अजिबात आडवा येता कामा नये.

त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने या घटनेकडे अजिबात दुर्लक्ष न करता हे प्रकरण गांभीर्याने दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही या निवेदनाव्दारे करीत आहोत.

यावेळी जनशक्ती युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष मयुर पवार, जनशक्ती युवा संघटना पिंपरी चिंचवड शहर सोशल मीडिया अध्यक्ष सुनिल घुले , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आकाश भोसले , दिगंबर भोसले, गौरव तोरमल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.