कोरपना मामा तलाव मध्ये बुडून एकाचा मृत्यू

34

🔺कोरपना पोलिसांनी मृत्यदेह बाहेर काढण्यासाठी चंद्रपूर चे बोलावले पथक

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.9ऑक्टोंंबर):- शुक्रवारला दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोरपना गावातील पुरूष नामे विकास शंकर कुमरे मु,कोरपना अंदाजे वय 28 वर्ष धंदा मजुरी हा कोरपना येथील मामा तलाव येथे नेहमी मच्छिपकडायला जायचा.

नेहमी प्रमाणे तो मामा तलाव येथे मच्छिपकडण्या करिता गेला असता त्याचा मामा तलाव मध्ये बुडून दुर्दवी मृत्यू झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे.

विकास कुमरे यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, असा बराच आप्त परिवार आहे, या मृत्यू नंतर कोरपना पोलीस स्टेशनला माहिती दिली असता,कोरपना पोलिसांनी मृत्यदेह बाहेर काढण्यासाठी चंद्रपूर चे पथक बोलावले आहे.