MPSCच्या विद्यार्थ्यांना राजकीय खेळीत ओढून त्यांच्या जिवनाशी-करीअरशी खेळणे अतिशय निंदनीय बाब आहे

31

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधिन राहून MPSC राज्य सेवा परिक्षा घेता आल्या असत्या.परंतु राज्य सरकारने MPSC परिक्षा रद्द करून बहुसंख्यांक बहुजन व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांवर अन्यायच केला आहे. एकतर गेल्या दोन वर्षांपासून MPSC च्या परिक्षाच सरकारने घेतली नाही.विद्यार्थी चार-वर्षांपासून अभ्यास करीत आहेत.

खेड्यापाड्यातुन विद्यार्थी मोठ्या शहरात परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी भाड्याने रूम घेऊन राहतात. ट्युशन क्लासेसचा खर्च, रूम भाडे, जेवण मेस खर्च, विद्यार्थी गेल्या चार पाच वर्षांपासून करीत आहेत.सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे सर्व परवडत नाही.15-15 16-16 विद्यार्थी रोज अभ्यास करतात. जिवापाड मेहनत करतात. अशा वेळी विद्यार्थ्यांची परिक्षाच रद्द करणे अन्यायकारक बाब आहे.UPSCची परिक्षा कोव्हिड काळातही घेण्यात आली.

MPSCच्या परिक्षे करीता मात्र कोव्हिडचे नकटे कारण सांगून विद्यार्थ्यांना फसविण्यात आले.मागील एक महिन्यापासून तर प्रत्यक्ष परिक्षा केंद्रात विविध अभ्यासक्रमाच्या परिक्षा तर सुरूच आहेत.भाजपच्या केंद्रातील सरकारने 102 वी घटना दुरुस्तीमुळे मराठा आरक्षणाला बाधा येण्याची शक्यता.2018 मध्ये संसदेत भाजप आरेसेसच्या मोदी सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केली.राज्य सरकारने राज्यात मागासवर्गीय आयोग नेमून एखाद्या जातीला मागासवर्गीय जाती जमातीत समावेश करण्याची मुभा होती.मात्र 102 वी मोदी सरकारने घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार काढून घेतले.

त्याऐवजी केंद्र सरकारला केंद्रीय मागासवर्गीय आयोग नेमून एखाद्या जातीला मागासवर्गीय जातीत समाविष्ट करण्याचे अधिकार बहाल केले. त्यामुळे मराठा समाजाला मागासवर्गीय जातीत समाविष्ट करण्याची राज्य सरकारची प्रक्रिया 102 व्या घटना दुरूस्ती मुळे अवैध ठरते.सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचकडे जेंव्हा मराठा आरक्षणाची सुनावणी होईल त्यावेळी 102 वी घटना दुरूस्ती नुसार निकाल दिला जाऊन मराठा आरक्षण रद्दबातल होऊ शकते अशी कायद्याच्या जाणकारांनी आशंका व्यक्त केली आहे.

केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातील राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी पूढील लोकसभा निवडणुकी पर्यंत तारीख पे तारीख चा गेम खेळू शकते.एवढेच नाही तर राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजात असंतोष निर्माण व्हावा म्हणून मराठा आरक्षण रद्द सुद्धा करण्याची खेळी खेळू शकते.शेवटी हा इश्यु आता राजकीय झाला आहे.अशावेळी MPSCच्या विद्यार्थ्यांना या राजकीय खेळीत ओढून त्यांच्या जिवनाशी-करीअरशी खेळणे अतिशय निंदनीय बाब आहे.

✒️लेखक:-सुरेश शिरसाट(राजकीय विश्लेषक,अकोला)
मो:-9850358305

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-८०८०९४२१८५