कळमनुरी येथे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

33

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.10ऑक्टोबर):-कळमनुरी शहरातील संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्राध्यापक भगवान मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन.आज विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा लोकप्रिय आमदार संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास उपस्थित महिला आघाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे कळमनुरी चे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे नगरसेवक रामभाऊ कदम गुड्डू भाऊ बांगर शिवसेनेचे तालुकाप्रमुख सखाराम उबाळे उपतालुका प्रमुख मारोतराव खांडेकर ॲडव्होकेट रवी शिंदे शहर प्रमुख संतोष सारडा नगरपालिकेचे गटनेते आप्पाराव शिंदे दादाराव डुरे राजू संगेकर सुहास पाटील बाळू पारवे अतुल बुर्से नामदेव कराळे युवा सेनेचे शिवराज पाटील बबलू पत्की उपजिल्हाप्रमुख मयूर शिंदे बाळासाहेब वायकोळे गजानन शिंदे पुयनेकर विलास मस्के सुहास नाईक पिंटू गडदे सतीश तांबारे शिवम नाईक संजय बोक्से अतुल वाघमारे सचिन मारकड अक्षय नाईक शैलेश ढाले शिवम सापनर सावन नाईक अनिल मस्के गोपाळ शिंदे बबलू पंचलिंगे यांच्या सह ईतर मान्यवर उपस्थित होते.