सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

40

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10ऑक्टोबर):-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात २२ मार्च पासून टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन सुरू झाला, आणि हा लॉकडाऊन बेरोजगारी, उपासमारी आणि नैराश्य सोबत घेऊन आला.कोरोनापासून लोकांचे रक्षण व्हावे या हेतूने गगनबावडा येथील प्रभारी आधिकारी ए.पी.आय. संगिता पाटील यांनी समाजातील लोकांना मास्क,सॅनिटायजरचे वाटप केले आहे.

संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना त्यांच्यातील समाजसेवक जागृत झाला आणि स्वयंप्रेरणेने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला. आपल्या जीवाची पर्वा न करता सतत समाजातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र लढत राहिला. कोरोनाला हरवण्याची जिद्द मनामध्ये ठेऊन आजही ते कोरोनाविरुद्ध लढाई देतच आहेत. त्यांचे हे कार्य समाजातील लोक, सेवाभावी संस्था पाहत होत्या. त्यांचे हे कार्य पाहून जी डी राठोड फांऊडेशन व सरपंच सेवा संघाने त्यांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी व सन्मानपत्राने त्यांना सन्मानित केले आहे.

यानंतर प्रमुख उपस्थित वसुमती देसाई (मॅडम) यांनी गगनबावडा डिव्हिजनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची स्तुती करत कर्तव्यदक्ष संगीता पाटील (ए.पी.आय) यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर ए.पी.आय पाटील मॅडम म्हणाल्या आज पर्यंत अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी म्हणून कार्य केले पण गगनबावडा या ठिकाणी कार्यरत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, त्यामध्ये महिलांच्या समस्या खूप होत्या, अनेक महिलांचे फॅमिली प्रॉब्लेम्स होते त्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झाली.

गेले दोन वर्ष मी त्या महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आत्ता पूर्ण तालुक्यामध्ये एकही ही अशी समस्या दिसून येत नाही. याच बरोबर अलीकडे आलेल्या कोरोना महामारी च्या काळातही पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, या कार्याची दाद घेऊन या फाउंडेशन ने केलेला सन्मान खूप कौतुकास्पद आहे. मी अनेक फाउंडेशन पाहिले पण सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणारे फाउंडेशन आज पहिल्यांदाच पहात आहे.

आणि भविष्यात ही या फाउंडेशन कडून असेच कार्य समाजासाठी घडावे अशी आशा बाळगून या फाउंडेशनला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील गगनबावडा तालुक्यातील प्रभारी अधिकारी ए.पी.आय. संगीता पाटील यांना कोविंड योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कारांसाठी कोरोना काळातील कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या कोरोना प्रतिबंधक कार्याबाबत, जनतेमधील कोरोना बाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक जागृती त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा आढावा घेऊन सत्कार करण्यात आला आहे.
पोलीस हे त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करत निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना योगदान देतात यामुळे कोरोना काळात यांचे सहकार्य मोलाचे आहे व अशीच आपली भरभराट होवो.

सदर आपले काम प्रेरणादायी आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील व डी जे राठोड फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश राठोड (सर) यांनी पत्राद्वारे दिली. पाटील (ए.पी.आय) यांना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या पूरस्काराचे वितरण सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करत गगनबावडा डिव्हिजन, तालुका गगनबावडा, कोल्हापूर येथे प्रमुख उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या वसुमती देसाई व दैनिक जनमत चे उपसंपादक सुरेश राठोड यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात प्रधान करण्यात आले.