महामंडळ,खासदार आमदारकीसाठी धनगर आरक्षणाचे राजकारण करू नका – दत्ता वाकसे

35

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.10ऑक्टोबर):-राज्यांमध्ये दोन कोटी असलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरून स्वतःची उपजीविका मेंढपाळ व्यवसायाच्या माध्यमातून धनगर समाज संपूर्ण राज्यामध्ये भटकंती करत आहे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजातील काही पुढारी स्वतःची पोळी भाजून घेताना दिसत आहेत.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून वणवा पेटलेला असताना राजकीय पुढाऱ्यांकडून स्वतःच्या घरात आमदारकी खासदारकी महामंडळ मिळण्यासाठी शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु धनगर समाजाने आता या पुढाऱ्यांना कुठल्या प्रकारचा थारा न देता आंदोलनाचे हत्यार उपसले पाहिजे असे प्रसिद्धीपत्रक धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की राज्यामध्ये गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय होत आहे राज्यामध्ये वेळोवेळी मेंढपाळ बांधवावर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत परंतु शासन प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीत संदर्भात 16 ऑक्टोंबर रोजी राज्यभर चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला होता परंतु राज्यकर्त्यांनी पुळचट आश्वासन दिल्यामुळे धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने पुन्हा धनगर समाजाला निराश करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु धनगर समाज आता शांत बसणार असून 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 288 आमदारांना मोटारसायकल यात्रेच्या माध्यमातून आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करून आमदाराकडून लेखी स्वरूपाचे निवेदन घेऊन त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपण विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये आवाज उठवावा याबाबत विनंती केली जाणार आहे.

ही पदयात्रा 17 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील सर्व आमदारांना निवेदन दिले जाणार आहे या यात्रेचे आयोजन मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विष्णु सायंगुंडे धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यासह मराठवाड्यातून हजारो युवक या मोटरसायकल यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत असे देखील धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.