राष्ट्रवादी काँ. आ.रोहित पवार यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून “स्वच्छता सर्वेक्षण अभियान” करण्यासाठी मातोश्री सुनंदाताई पवार यांचा पुढाकार

34

✒️कर्जत(विजय कांबळे,प्रतिनिधी)मो:-8454021607

कर्जत(दि.11ऑक्टोबर):-कर्जत-जामखेड चे आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी तालुक्यात “स्वच्छता सर्वेक्षण अभियान” यांनी महत्वाकांक्षी विडा करून कर्जत- जामखेड या तालुक्याचा कायापालट करणार आहे. तसेच सौ. सुनंदाताई यांनी कर्जत तालुक्यातील प्रभाग क्र.१४ मधील भवानी नगर व निरनिराळ्या प्रभाग, सोसायटी, बाजारतळ, यांची भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून स्वच्छता अभियान चे महत्व पटवून दिले आहे.

सौ.सुनंदाताई यांनी कर्जत तालुक्याला नवा चेहरा देण्याचे स्वप्न साकार करून या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान करत आहे. तसेच सौ.सुनंदाताई यांनी स्वच्छता सर्वेक्षण अभियान संबंधित काही महत्त्वाचे गोष्टी सांगत आहे. या स्वच्छता मोहीमात आपल्या घराआजूबाजूचा परिसर साफ ठेवणे, शुभोशित झाडे लावणे, तसेच टाकाऊ वस्तू पासुन कुडी बनवणे तसेच इत्यादी गोष्टी सांगितले.

सौ.सुनंदाताई यांनी माझे कर्जत माझ घर म्हणत मला स्वच्छता करायचे आहे तसेच त्यांना कर्जत वरील अस्वच्छतेचा डाग आपल्या सर्वांनी मिळून पुसायचा आहे. तसेच त्यांनी आपली स्वच्छते संदर्भातील कोणतेही तक्रार स्वच्छता सर्वेक्षण अभियान अॅप द्वारे माडली आहे. या तक्रारींसाठी नागरिकांना नगरपरिषदे जाण्याची शक्यता नाही. या अॅप द्वारे २४ तासाच्या आत आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल.