🔸इंद्रायणी अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश ढमाले यांची तहसीलदारांकडे मागणी

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.13ऑक्टोबर):- मावळ तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत काही दिव्यांग बांधवांना मासिक ८००/-रू तर काही दिव्यांग बांधवांना १०००/- रु अशा स्वरूपात असमान पेंशन मिळते.तसेच ही पेंशन शासननियमानुसार दरमहा नियमित मिळणे अपेक्षित असताना ३ ते ४ महिन्यांनी एकत्र मिळते.अशी असमान पेंशन मिळत असल्याने भेदभाव होत असून अन्याय होत आहे. त्याचबरोबर अनियमित पेंशन मिळत असल्याने ऐन कोरोना काळात हाती काम नसल्याने दिव्यांगबांधवांना अर्थिक खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे या प्रश्नांची दखल घेवून सर्व दिव्यांग बांधवांना समान १०००/- रू मासिक पेंशन मागील फरकासह दरमहा नियमित देण्याची मागणी कामशेत येथील इंद्रायणी अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश ढमाले यांनी वडगाव-मावळचे तहसीलदार श्री मधुसूदन बर्गे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.यावेळी मे.तहसीलदारसाहेबांनी याबाबत तात्काळ योग्य ती पुढील कार्यवाही करून दिव्यांग बांधवांचे हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी दिव्यांग कार्यकर्ते श्री मोहन दळवी,संपत ननावरे,मैनूददीन शेख ,श्री अंबादास गर्जे हे उपस्थित होते.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED