समस्त ख्रिस्ती समाज पिंपरी चिंचवडच्या वतीने हातरस येथील घटनेचा जाहीर धिक्कार व निषेध

28

🔹पिंपरी चिंचवड येथे ख्रिस्ती समाजाने केला निषेध

✒️अतुल उनवने(विशेष प्रतिनिधी)मो:-9881292081

पिंपरी चिंचवड(दि.13ऑक्टोबर):-हाथरस (उत्तरप्रदेश) या ठिकाणी मनीषा वाल्मिकी या अत्यंत गरीब व दलित कुटुंबातील तरुणीवर झालेला सामुहिक बलात्कार प्रकरण अत्यंत अमानवीय,अमानुष छळ, हत्या व शव जाळून पुरावे नष्ट करणाऱ्या उत्तरप्रदेश राज्य शासनाचा व पोलिस यंत्रणेचा “जाहीर धिक्कार व निषेध” पिंपरी चिंचवड येथील समस्त ख्रिस्ती समाजच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील शहरातील विविधवसामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या उपस्थित शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी, पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे ब्र.डेव्हिड काळे, ब्र.सचिन गवारे, पा.सॅमसन चोपडे, ब्र.प्रशांत भालशंकर,रेव्ह.सचिन भालेराव, अल्फा ओमेगा ख्रिस्ती ल महासंघाच्या सिस्टर अनिता नायडू, ब्र.कुशल सोज्वळ, चर्च ऑफ नॅझरीनचे पा. बन्यामिन काळे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे ब्र.नितीन गायकवाड, दि यूनाइटेड ख्रिश्चन युथ असोसिएशनचे ब्र.फ्रान्सिस गजभिव, ख्रिश्चन एकता मंचचे ब्र.प्रकाश पठारे, प्रेयर पॉवर सामाजिक संघटनेचे रेव्ह. सॉलोमन भंडारी, सेफी डायोसिसचे बिशप सॅमुएल रपेकर, ग्लोरियस इवांजीलीकल मिनिस्ट्रीजचे बिशप अनिष विजागत,चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ब्र.संदेश बोर्डे, सि.तानिया कोनयाक यांच्यासह सर्व अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या वतीने व सर्व सदस्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

कोरोना व्हायरस मुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत,या निषेध सभेस पिंपरी चिंचवड मधील निवडक ख्रिस्ती बांधव व पाळक वर्ग उपस्थित होते.मराठी विश्वासचे दिनकर इंगळे, पा.रवी शेट्टी, ब्र.अमृत नायडू, सि.पूजा, सि.अपर्णा काळे,सि.मेरी भालेराव,पा.पिटर सोनावणे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.कारण यांनी या निषेध मार्च साठी मोठं योगदान देण्यासाठी मदत केली. या निषेध सभेचे आयोजन ब्र.डेव्हिड काळे, पा.अनिता नायडू, ब्र.प्रकाश पठारे, ब्र.सचिन गवारे, पा. बन्यामिन काळे, ब्र.फ्रान्सिस गजभिव, रेव्ह.सचिन भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार पा. बन्यामिन काळे यांनी
केले.