केंद्र सरकारने हुकूमशाहीचा परिचय देत लादलेले शेतकरी विरोधी कायदे वापस घ्यावे – आमदार सुभाष धोटे

29

🔸शेतकरी बचाओ डिजिटल रॅलीच्या माध्यमातून राजुरा काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

राजुरा(दि.16ऑक्टोबर):-आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२० ला आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे शेतकरी बचाओ डिजिटल रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी बचाओ रॅली, शेतकरी विरोधी काळे कायदे महाराष्ट्रात अडवणार या डिजिटल लाईव्ह रॅलीचे थेट प्रक्षेपण तालुक्यातील नागरिकांना दाखवण्यात आले.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज देशभरातील शेतकरी, शेतमजूर आणि बाजार समित्यांच्या व्यवसायाशी निगडित लाखो छोटे व्यापारी, कामगार यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. माननीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि खासदार श्री राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये आंदोलने केली जात आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने बहुमताचा गैरवापर करून, शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता पारीत केलेले हे कृषी कायदे तातडीने मागे घेतले पाहिजे, हीच मागणी आज देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांनी देखील केली आहे.

या प्रसंगी- राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष अशोकराव देशपांडे, अॅड, सदानंद लांडे, जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे, प.स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदाताई जेणेकर, न.प सदस्य हरजित सिंग संधु, बाजार समिती संचालक अविनाश जेणेकर, राजुरा शहर अध्यक्ष संतोष गटलेवार, कार्याध्यक्ष नंदकिशोर वाढई, माजी कार्याध्यक्ष साईनाथ बतकमवार तालुका युवा कॉंग्रेस अध्यक्ष संतोष शेंडे, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, अॅड. मारोती कुरवटकर, माजी कृ. उ. बा.स. संचालक रंजन लांडे, माजी सरपंच कवडू सातपुते, धनराज चिंचोलकर, उपसरपंच सर्वानंद वाघमारे, आनंदराव गावंडे, सरपंच लहू चहारे, वसंत ताजने, विकास देवाडकर, दिपक वांढरे, सुरेश इसनकर, वामन वाटेकर, शिवराम लांडे, साबीर सय्यद, हरीशचंद्र जुनघरी, संतोष इंदुरवार, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, उपसरपंच इर्शाद शेख, भास्कर चौधरी, राजकुमार ठाकूर, राजू नवघडे, अनंता ताजने यासह मोठ्या संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.