पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संदीप जाधव यांच्या कुटूंबास तातडीची पाच लाख रुपये मदत देण्यात यावी – वैभव गिते

26

✒️समाधान गायकवाड(माजलगाव विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

माळशिरस(दि.17ऑक्टोबर):-कालच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मराठा समाजातील गरीब कुटुंबातील तरुण कळस ता.इंदापूर येथून पाण्यात वाहून गेला.कुटुंबातील सदस्यांच्या व प्रशासनाच्या मदतीने दुसऱ्या दिवशी पाणी कमी झाल्यावर संदीप जाधव यांचा मृतदेह सापडला संदीप यांचा स्वभाव अतिशय गोड व मनमिळाऊ असल्याने कुरबावी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दिनांक १६,१०,२०२० रोजी कुरबावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार देशमुख यांची भेट घेऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीची पाच लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी.संदीप हा माळशिरस तालुक्यातील रहिवासी होता परंतु घटना इंदापूर तालुक्यातील असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांनी जबाबदारी झटकू नये.

समन्वय साधून जाधव कुटुंबास तात्काळ तातडीची मदत देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले तसेच वैभव गिते साहेबांनी याबाबत इंदापूर तालुक्यातील आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

सोमवारी पुन्हा इंदापूर तालुक्यातील तहसीलदार यांना व एक शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना भेटणार आहे. अशी माहिती (एन.डी.एम.जे) संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते.प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

निवासी नायब तहसिलदार यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी राज्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे व तालुक्याचे नेते संभाजी साळे उपस्थित होते.