पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा आंदोलन छेडू- अतुल खुपसे

31

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी):-9075913114

गेवराई(दि.17ऑक्टोबर):-पावसाळाच्या हंगामाच्या अखेरीला परतीच्या पावसाने माढा व करमाळा तालुक्या सह सोलापूर जिल्ह्या मध्ये धुमाकाेळ घातला आहे . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री जिल्हाधिकारी सह संबंधितांना पत्र लिहून अतुल खुपसे यांनी मागणी केली आहे की पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच माेडलेले आहे . साखर कारखान्यांना आता जाणारा ऊस शेता मध्ये आडवा झालेला आहे . यामुळे त्या उसाचे वजन ही कमी होऊन ऊस उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे . केळीच्या पपई व द्राक्षाच्या बागा याचे तर अतोनात नुकसान झालेले आहे . शेतकऱ्यांच्या शेता मधी तूर सोयाबीन उडीद यालाही फार मोठा फटका बसलेला आहे. फळ बागायतदार शेतकरी तर पुढील द‍ाेन वर्ष उबदारी येनार नाही.

भाजीपाला टोमॅटो सारखी पिके मुसळधार पावसात जमीनदोस्त झालेली आहेत . पुराच्या पान्यात जनावरे वाहून गेलीत . अनेक घरा मधे पाणी शिरुन माेठे नुकसान झाले आहे . शेतकरी वर्गाचे नुकसान कधीही भरून न येणारे आहे . यामुळे शासनाच्या कृषी विभागाने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करावेत . नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी अतुल खूपसे पाटील यांनी निवेदना द्वारे केलेली आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मदत होईल यासाठी बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आंदोलन करून शेतकऱ्याला मदत शासनाने केली नाही तर भविष्यात आंदोलन उग्र छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.