नाशिकचे उपजिल्हाधिकारी श्री.गणेश मिसाळ साहेब यांच्या तर्फे धुळ्यातील गरजू परिवारांना किराना सामानची मदत

    34

    ✒️ संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

    धुळे(दि.17ऑक्टोबर):-धुळे शहराचे तत्कालीन प्रांतसाहेब व सध्या नाशिकचे उपजिल्हाधिकारी असलेले आदरणिय दानशुर व्यक्तीमत्व असलेले श्री.गणेशजी मिसाळ साहेब यांच्या तर्फे धुळ्यातील गरजू कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराना सामान देण्यात आला.

    सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर सुरू असलेल्या लॉक डाऊनचा प्रभाव अद्यापही कायम आहे.तसेच.धुळे शहरातील उद्योग व्यवसाय पुर्वपदावर येत आहेत.ही शहरवासीयांसाठी दिलासा देणारी घटना आहे.परंतू धुळे शहरातील उद्योग व्यवसाय अद्यापही पुर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.त्यामुळे शहरातील विवीध अस्थापनातील कामगारांना काम सुरू करूनही दोनतिन महीन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाहीत.त्यामुळे सदरच्या मजूरांच्या घरातील व्यक्तींचे पोट कसे भरायचे असा यक्ष प्रश्न शहरातील मजूर वर्गापुढे उभा निर्माण झाला आहे.

    म्हणूनच आम्ही धुळेकर संघटनेने गरजू कामगारांसाठी दानशुरांकडे किराना सामानच्या मदतीचे जाहीर आवहान केले होते.व त्या आवहानास नाशिकचे उपजिल्हाधिकारी श्री.गणेशजी मिसाळ साहेब यांनी तत्काळ प्रतिसाद देवून नाशिक येथूनच आम्ही धुळेकर संघटनेकडे पुरेसा निधी पाठवला होता.सदरच्या निधीतून दोन गरजू परिवारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराना सामान मदत रुपाने संघटना प्रमुख धनंजय गाळणकर यांच्या हस्ते देण्यात आला.

    व याप्रसंगी किराना सामानचे लाभार्थी मिल कामगार श्री.सुनिल सोनटक्के यांनी श्री.गणेशजी मिसाळ यांचे मनपुर्वक आभार व्यक्त करून समाधान व्यक्त करत अजून महीनाभर जरी पगार मिळाला नाही.तरी पोटाची चिंता नाही.अशी समाधान पुर्वक भावना व्यक्त केली.