माहुरगड च दुसरं ठाण म्हणजे जातेगावची यमाई माता

73

🔸कोरोणा मुळे यंदा यमाई मंदीरात साध्या पद्धतीने नवराञ उत्सव : यमाई संस्थानच्या पदाधिकारी याची माहिती

✒️गोपाल भैय्या चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.19ऑक्टोबर):-माहुरगड येथील रेणीका मातेच दुसरं ठाण स्थान हे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जागृत व नवसाला पावणारी आई यमाई मातेची ख्याती भक्त सांगतात वर्षात दोन वेळा मराठावाड्यासह महाराष्ट्रातुन भावीक भक्त जातेगावला येतात.

ते म्हणजे पौष महीण्यात पौष पोर्णिमेला चार दिवशीय पालखी सोहळा व नवराञ उत्सवात नऊ दिवस परंतु यंदा आई यमाई माता नवराञ उत्सव कोरोणा मुळे शासनाने दिलेल्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा होत असुन भावीकानी गर्दी करु नये नियमाचे पालन करावे असे आवाहण यमाई ट्रस्ट याच्याकङुन करण्यात आले आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जागृत व नवसाला पावणारी यमाई माता पुरातन मंदीर आहे दहा ते बारा वर्षापूर्वी गावातील प्रतिष्ठीत नागरीकानी एकञ येत यमाई मंदीराचा जिर्णोद्धार केला भव्य असे सुंदर मंदीर उभारणी केली आहे.यमाई मातेची वर्षातुन दोन वेळा याञा भरते पौष पोर्णिमेला पालखी सोहळा व याञा आणी नवराञ उत्सवात नऊ दिवस गेवराई बीङ सह मराठवाडा महाराष्ट्रातुन भावीक दर्शनाला येतात.

नवसाला पावनारी जातेगाव ची यमाई माता अशी ओळख महाराष्ट्रभर आहे यंदा कोरोणा संकटामुळे यमाई नवराञ उत्सव साध्या पद्धतीने व पुजा विधी आणी धार्मिक विधी करुन सोशल ङिस्टन्स ठेऊन साजरा करण्यात येत असुन दर्शनासाठी भावीकानी गर्दी करु नये नियमाचे पालन करावे असे ही यमाई देवी संस्थान व यमाई सेवा संघ आणी ग्रामस्थानी आवाहन केले आहे.