संरक्षण कवच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

36

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.19ऑक्टोबर):-धार्मिक श्रद्धा व आचारविचार तसेच त्यांमागील जीव-जगत्-ईश्वरविषयक तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म यांनी प्रेरित झालेली व त्यांचा आविष्कार करणारी कला म्हणजे धार्मिक कला असे सामान्यपणे म्हणता येईल. धार्मिक श्रद्धा आणि भावना, धार्मिक पारमार्थिक अनुभूती व विकास धार्मिक ध्येयवाद, धार्मिक प्रसार वा प्रचार, धार्मिक चमत्कार आणि साक्षात्कार लौकिक जीवनाचे धर्मदृष्टीतून केलेले चित्रण–वर्णन हे किंवा यांच्याशी निगडित असे अनेक विषय धार्मिक कलाविष्कारात अंतर्भूत होतात.

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि लेखक श्री. जि. ल.खडके गुरुजी यांनी संरक्षण कवच हे पुस्तक लिहिले आहे.आदरणीय गुरुवर्य आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व योग्य दिशा दाखवणारे श्री. खडके गुरुजी तसेच आपल्या भगिनी व आपल्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सेवा करणाऱ्या मनीषा कमलाकर यांच्या संयुक्त भागीदारीने अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजेच हे पुस्तक. ज्यामध्ये लक्ष्मी प्राप्ती व दुःख निवारण तसेच सर्व समस्यांवर प्रभावी उपाय दिले असून श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या आज्ञेनुसार गुरुजींनी हे पुस्तक लिहिले आहे.

दैनिक जनमत शी बोलताना, महाराज श्री स्वामी समर्थ यांच्या साधनेमध्ये लिहिलेले हे पुस्तक आहे. तसेच लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचवणे व समस्या, दुःख निवारण करणे याकरिता याची निर्मिती केली आहे असे गुरुजींनी उद्गार काढले. त्यानंतर संरक्षण कवच पुस्तकाची माहिती देऊन खडके गुरुजींनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच गुरुजी व मनीषा यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

सौ. अर्चना खडके, स्वप्निल संकपाळ, पंकज जाधव, विशाल एक शिंगे, सोनाली एकशिंगे, सनी तोरस्कर, प्रकाश टिपुगडे, उदय पडवळ, ऋतुजा चव्हाण, ऐश्वर्या कलस, शेखर जबडे, विश्वास वगदे, प्रतिक काकडे, अमित घट्टे, योगिता घट्टे, रवींद्र तेलगी हे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सेवेकरी उपस्थित होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून संरक्षण कवच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.