गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदी डॉक्टर रमेश पवार रुजू

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19ऑक्टोबर):-गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक पदाचा कारभार प्रभारी अधीक्षक म्हणून पाहिला आहे आठ वर्षानंतर उपजिल्हा रुग्णालयाला गंगाखेडला पूर्ण वेळ नाशिक येथून अधीक्षक पदी डॉक्टर रमेश पवार यांनी पदभार स्वीकारला आहे सन २००२ला गंगाखेड ग्रामिन रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालय मध्ये झाले होते.

त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक परी डॉक्टर डॉक्टर राम बियाणी यांनी प्रथम वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिले होते त्यानंतर डॉ.व्ही. डी. बडे, डॉक्टर एस. पी.चांडक, डॉ. बि.पाटील, डॉ.अर्.डी. खंदारे,डॉ. एम. सी. ब्याळे, डॉ. एम. जी. टेहरे, यांनी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदी काम पाहिले होते.

दि.०९/०६/२०१२ते आज पर्यंत वैद्यकीय अधिक्षक हे पद प्रभारी होते या दरम्यान डॉक्टर एस. पी.चांडक, डॉ. मनीषा पवार, डॉ. एस.पी. मस्के,डॉ. एम. सी. ब्याळे, डॉ. हेमंत मुंढे आदींनी प्रभारी पदभार सांभळला असून गंगाखेड ला पुर्ण वेळ वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ. रमेश पवार यांनी पदभार स्वीकारला आहे.