प्रणव तत्तापुरे चे NEET परीक्षेत नेत्रदिपक यश

31

✒️संजय कांबळे माकेगावकर (अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपुर(दि.19ऑक्टोबर):- लातूर च्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा नीट परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून त्यात प्रणव रामलिंग तत्तापुरे याला 720 पैकी 681 गुण मिळाले. त्याची देशात जनरल रैंक 566 तर OBC rank 151 आली.प्रणव च्या नेत्रदिपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.या वेळी प्रणव प्रतिनिधी शी बोलताना म्हणाला की माझ्या यशा चे श्रेय महाविद्यालया चे प्राध्यपक माझे आई वडील यांना असल्याचे सांगितले.

या नेत्रदिपक यशाबद्दल शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाँ. गोपालराव पाटील, सचिव प्रा. अनिरुद्ध जाधव, प्राचार्य बी. ए मैंदरगेकर, समन्वयक दिलीप देशमुख, सी. ई. टी. सेल प्रमुख प्रा. सतीश पवार, प्रा. विनोद झरी टाकळकर, प्रा. राहुल देशमुख यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच आदर्श महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने प्रणव तत्तापूरे याला पुढील शैक्षाणिक जीवनात असेच नेत्रदीपक यशप्राप्ती होवो यासाठी खूप खूप शुभेच्छा……