अँड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख रयत शेतकरी संघटना अध्यक्ष यांचे मंगळावर रोजी गेवराई मध्ये आगमन होणार

69

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.19ऑक्टोबर):-देशमुख साहेब यांच्या
प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रागृहावर गेवराई येथे बीड जिल्ह्यातील सर्व रयत शेतकरी संघटनेचे सर्कल पातळीवरील व कार्यकर्त्याची महत्व पूर्ण बैठक होणार आहे.. व सुनील ठोसर यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत संघटनेचे बीड जिल्ह्यातील सर्व कामाचा आढावा घेऊन बैठकीत बीड जिल्ह्यातील संघटनेच्या काही पदाधिकारी निवडी बापुसाहेब देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे.आणि ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी राजा खूप अडचणीत आहे.

अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व तात्काळ पंचनामे करून पिक नुकसान भरपाई देण्यात यावी व पीककर्ज तत्काळ द्या, पीकविमा तत्काळ वाटप करा यासाठी गेवराई तहसील, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, बँक, नगर परिषद वर आंदोलन मंगळवार रोजी ठिक बारा वाजता करण्यात येणार आहे..आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. अशा घोषणा देण्यात येणार आहे.