संघर्ष हक्कासाठी , शेतकऱ्यांचा भविष्यासाठी

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.19ऑक्टोबर):- शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे ,त्या अनुषंगाने आज शिंदखेडा येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक संपन्न झाली.

या बैठकीत तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्वाक्षरी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार झाला, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून दिड लाख स्वाक्षरीचे लक्ष्याकं साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्हा परिषद गटाची बैठक व स्वाक्षरी मोहीम दि. २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता घेण्याचे निश्र्चित करण्यात आले असुन दि.२४ रोजी गाव पातळीवर स्वाक्षरी मोहिमेचे बुध लावणयाचा निर्धार या बैठकीत करण्यात.

१)मालपुर गटांची बैठक हेमराज नाना यांच्या डेअरी येथे
२)विखरण गटांची बैठक साई बाबा मंदिर येथे
३)मेथी गटांची बैठक सावता महाराज मंदिर येथे
४)वर्षी गटांची बैठक कमखेडा येथे
४)खलाणे गटांची बैठक गावदरवाजा येथे
६)नरडाणा गटांची बैठक गाव विकास सोसायटी , गाव दरवाजा जवळ
७)धमाणे गटांची बैठक ग्रामपंचायत येथे
८)बेटावद गटांची बैठक सोसायटी कार्यालय,बस स्डण्ड येथे
९)विरदेल गटांची बैठक भडणे ग्रामपंचायत चौक येथे
१०)चिमठाणे गटांची बैठक जखाणे येथील होळी चौक येथे होणार आहे
११) बळसाणे गटांची बैठक बस स्टण्ड
१२)दुसाणे गटांची ग्रामपंचायत चौक येथे होणार आहेत
व दोंडाईचा शहर दि.२२ वार गुरूवारी व
शिंदखेडा शहर दि.२६ वार सोमवारी .रोजी स्वाक्षरी मोहीम सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच दि.२३ रोजी प्रत्येक गावात दवंडी देणे व फलक लावुन जनजागृती करण्यात येईल व दि.२४ रोजी प्रत्येक गावात सकाळी ७ ते १० या काळात बुथ लावुन गावपातळीवरील शेतकऱ्यांचा स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात येईल तरी या कार्यक्रमात. हजारो शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या या धोरणांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनी केले.

सदर स्वाक्षरी मोहिम यशस्वी करण्यासाठी मा. ना.बाळासाहेब थोरात साहेब , धुळे जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना.के.सी‌.पाडवी साहेब , जिल्हाचे प्रभारी विनायकरावजी देशमुख ,आ.कुणाल पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.