सरसकट दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत व विमा रक्कम वर्ग करा – सुनील ठोसर पाटील

34

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.19ऑक्टोबर):-अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीत उडीद,मग,तूर,कापूस, केळी,डाळिंब,मोसंबी, सर्वच फळ भाज्या अश्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे यासाठी घरी व मंत्रालयात बसून हजारो कोटींचे कर्ज असणाऱ्या बड्या लोकांना सवलतीत माफी दिली जाते आणि जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी बांधवांना ठोस मदत होईल.

यासाठी कुठल्याही राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रशासकीय पाऊले उचलली नाहीत फक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले ते ही अपूर्ण असून शेतकरी बांधवांना चालढकल करीत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे कर्ज माफी मध्येही अनेक अडचणी येऊ लागल्या, पीककर्ज मिळेना, बँक अधिकारी पोलिस अधिकारी यांच्या जीवावर शेतकरी बांधवांना दमदाटी करून वेळ काढूपणा करत शेतकरी बांधवांना नुसते तारीख पे तारीख असा आसेवर कुठवर धीर धरायचा असा प्रश्न पडतो.

बळीराजाचा अंत पाहू नये! बड्या अनेक लोकांना हजारो कोटी रुपयांची मदत केली यावेळी कोणत्या नेत्यांनी व पक्ष्यांनी दौरे काढून पाहणी केली असा स्पष्ट प्रश्न रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा प्रमुख सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी सांगितले असून आमच्या गोरगरीब जनतेसाठी शेतकरी बांधव यांचेसाठी येवढे नाटक का बरं आजपर्यंत शेतकरी,युवक,निराधार,वंचित, शोषित,पीडित, आत्महत्या ग्रस्त कुटुंब, सर्वच विभागात विविध प्रलंबित समस्या याचे काय फक्त राजकीय पक्षांनी झोळी घेऊन भरण्याचे काम केले.

यापेक्षा आमच्या गोरगरीब जनतेसाठी काहीच केले नाही असा आरोप स्पष्ट बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले आजही हजारो शेतकरी, रुग्णाच्या मदतीसाठी बीड जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणी अड रवीप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला कुठल्याही विभागात कुठल्याही कामासाठी अडवल्यास नेता अधिकारी नागडा केल्याशिवाय राहणार नाही असे ही सुनील ठोसर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले.

आमच्या शेतकरी बांधवांना ठोस पावले घ्या नसता आम्ही कुणालाही सोडणार नाही बीड जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणी एकही नेता व अधिकारी कुठेही फिरकू देणार नाही माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व अजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने सूचना देतो आम्हाला संपवणाऱ्याला राजकारणातून बाहेर काढेल असेही सुनील ठोसर पाटील यांनी यावेळी सांगितले बीड जिल्ह्यातील सर्व नेते लॉक डाऊन व कोरोना या काळात एकही नेता थेट शेवटच्या माणसापर्यंत पोहचला नाही, मोबाईल फोन बंद करून ठेवले, गावचे चले चपटे तर फरार झाले.

आम्ही जाती धर्म पंथ जात झेंडे नेता संघटना बघून प्रेम केले आमचे काय चुकले असा प्रश्न बीड जिल्ह्यातील सामान्य माणसाला पडला आहे यासाठी कुठल्याही ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले आहे कुठल्याही ठिकाणी जाऊन फक्त आसूड घेऊन दोन हात करणारे मावळे निर्माण होणे गरजेचे आहे असे सांगून बीड जिल्ह्यातील मायबाप सरकारने शेतकरी बांधवांना मदत केली नाही तर मी एकही कार्यालय, नेता, अधिकारी फिरू देणार नाही गाठ माझ्याशी आहे माझा अंत पाहू नये हीमंत असेल तर कुठल्याही पदाधिकारी,नेता,पार्टी,संघटना, पक्ष यांनी आम्हाला दोन हात करण्याची तयारी दाखवा आम्ही कुठल्या नकली नोटा नाहीत.

तुमची जिर्वण्यासाठी खंबीर नेतृत्व करत आहे पूतना मावशीचे प्रेम म्हणजे घात आपण श्री कृष्ण रूपाने बळीराजाच्या घात करणाऱ्या नेता,पदाधिकारी,सरकार, विरोधी पक्ष नेते सगळे लबाड व बांडगुळ असून दिशाभूल रावणाचा घात करुन दसरा मेळाव्यात शापत घेणार यापुढे बीड जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल व फसवणुक कराल तर याद राखा असेही सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत जाहीर केले.