पाटोदा जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

34

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.19ऑक्टोबर):-यंदा फेब्रुवारी महिण्यात शिष्यवृत्तीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या, त्याचा निकाल जाहीर झाला असून नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले अाहेत. बरबडा केंद्रामध्ये सर्वाधिक पाटोदा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले.

असून नायगाव तालुक्यातील ग्रामिण शाळांचा विचार केल्यास या शाळेचा यावर्षीचा शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल सर्वात जास्त आहे.सद्यस्थितीत सर्वत्र जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत असून पालक वर्गात खासगी शाळांचा प्रभाव पहावयास मिळतो. पण पाटोदा जिल्हा परिषद शाळेने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करून जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व दाखवून दिले आहे.

भौतिक सुविधांचा दुष्काळ असून सुद्धा या शाळेतील अनुसया भाऊराव तिजारे, मोहिणी श्रीधर देशमुख, शिवराज माधवराव शिंदे, विठ्ठल रामदास शेंडगे, रोहीनी चक्रधर देशमुख, ऋतुजा बालाजी पुपलवाड हे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.

नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी लता कौठेकर, शिक्षण विस्तार अधिकारी अधिकारी सुरेश पाटील, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंगराव पा. शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून मुख्याध्यापिका विमल कांबळे, लक्ष्मीकांत मुखेडकर, चंद्रकांत आमलापुरे, राहुल भद्रे, दयानंद खिंडे, माधव पाटील, ज्योती गिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.